Advertisement

सावरकरांचे गायींबद्दलचे विचार तुम्हाला मान्य आहेत का? ठाकरेंचा भाजपला थेट प्रश्न


सावरकरांचे गायींबद्दलचे विचार तुम्हाला मान्य आहेत का? ठाकरेंचा भाजपला थेट प्रश्न
SHARES

'सावरकर' आणि हिंदुत्वाच्या मुद्यांवरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना भाजपला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गायीबाबतचे विचार मान्य आहे का?', असा थेट प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी करत भाजपने विधीमंडळात प्रचंड गोंधळ घातला होता. शिवाय सावरकरांविषयी अवमानकारक शब्द काढणाऱ्या काँग्रेस नेत्यांबद्दल शिवसेनेची भूमिका काय असा प्रश्न विचारत भाजपने शिवसेनेला कोंडीत पडकण्याचा प्रयत्न केला होता. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी चौफेर टोलेबाजी करत भाजपचा हा प्रयत्न हाणून पाडला.

हेही वाचा- गरीबांना बुलेट ट्रेन नाही, तर रिक्षाच परवडते, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

केंद्रातील भाजप सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा केला. परंतु हा कायदा देशभरात लागू का करता आला नाही? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. त्यासाठी त्यांनी गोव्याचा दाखला दिला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांनी गोव्यात गोमांस कमी पडू देणार नाही. तसंच भाजपचे मंत्री किरेन रिजीजू यांनी मी बीफ खाणार असं वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रात गाय माता आणि बाजूला जाऊन खाता असं भाजपचं धोरण असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

हेही वाचा- कितीही चिखल करा, कमळ फुलू देणार नाही, पहिल्याच भाषणात आदित्य ठाकरेंचा घणाघात

आम्हाला सावरकरांच्या स्वप्नातील अखंड हिंदुस्तान हवा आहे, तुम्हाला हवा की नको ते ठरवा. तुम्ही सावरकर कुणाला शिकवता? तुम्हाला तरी ते नीट कळलेत का? सावरकरांचे संपूर्ण हिंदुत्व आणि गायींबाबतचे विचार भाजपला मान्य आहेत का? असा खडा सवालही त्यांनी केला.  

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा