Advertisement

कितीही चिखल करा, कमळ फुलू देणार नाही, पहिल्याच भाषणात आदित्य ठाकरेंचा घणाघात

शिवसेनेचे आमदार ​आदित्य ठाकरे​​​ यांनी गुरूवारी विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात भाजपवर घणाघाती प्रहार केला.

कितीही चिखल करा, कमळ फुलू देणार नाही, पहिल्याच भाषणात आदित्य ठाकरेंचा घणाघात
SHARES

सत्तेच्या लोभापायी मित्रांना कसं डावललं जातं हे मी पाहिलं आहे. पण तुम्ही कितीही चिखल करा, आम्ही कमळ फुलू देणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात भाजपवर घणाघाती प्रहार केला.

हेही वाचा- शिवसेनेकडून जीवाला धोका : किरीट सोमय्या

नागपूर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशात सध्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना आदित्य यांनी विधानसभेतील आपलं पहिलं भाषण केलं. या भाषणादरम्यान त्यांनी एकेकाळचा मित्रपक्ष असलेल्या भाजपचा चांगलाच समाचार घेतला. सोबतच बदलतं हवामान, बेरोजगारी, शिक्षणाचा खालावता दर्जा इत्यादी विषयांवरही आपली मतं मांडली. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारला हाराकिरीचं सरकार म्हणून चिडवलं होतं. आधी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आल्याचं म्हटलं होतं. त्याला आदित्य ठाकरे यांनी प्रतिउत्तर दिलं. 

हेही वाचा- केंद्राच्या जीवावर कर्जमाफीची घोषणा केली का? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे विचार वेगवेगळे असले, अनेक मुद्द्यांवर मतभेद असले किंवा निवडणुकीआधी या तिन्ही पक्षांनी एकमेकांवर कितीही आरोप केलेले असले, तरी सर्वसामान्यांच्या भल्यासाठी हे तिन्ही पक्ष जवळ आले आहेत. राज्याचा विकास करण्यासाठीच या सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असं आदित्य यांनी सांगितलं. 

संबंधित विषय
Advertisement