Advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महाविकास आघाडी?

महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला केवळ राज्यातील सत्तेपुरताच मर्यादीत असल्याचं वाटत असलं, तरी या फाॅर्म्युल्याचा प्रयोग स्थानिक पातळीवरही होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महाविकास आघाडी?
SHARES

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने नवा राजकीय फाॅर्म्युला तयार केला. या फाॅर्म्युल्याने भाजपलाच नाही, तर सर्वसामान्यांनाही चक्रावून सोडलं. हा फाॅर्म्युला केवळ राज्यातील सत्तेपुरताच मर्यादीत असल्याचं वाटत असलं, तरी या फाॅर्म्युल्याचा प्रयोग स्थानिक पातळीवरही होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- ‘तेव्हाच’ होईल मंत्रिमंडळ विस्तार, अजित पवारांचा खुलासा

येत्या काळात राज्यभरात ठिकठिकाणी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिथं शक्य असेल, तिथं महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितरित्या निवडणुका लढवल्या जातील, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. 

नागपूर इथं विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशादरम्यान काँग्रेस आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. या बैठकीआधी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना थोरात यांनी हे मत व्यक्त केलं. 

हेही वाचा- बेळगावातील मराठी माणूस हिंदू नाही का? निघाले देशाबाहेरील हिंदूंना न्याय द्यायला- ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांचं मिळून हे सरकार स्थापन झालं आहे. या तिन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये सुसंवाद निर्माण होण्यासाठी मागील महिन्याभरात अनेक बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. हे सरकार योग्य समन्वयाच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल, असंही थोरात म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा