Advertisement

मुंबईकर शार्दुलची विराट रोहलीनं मराठीतून केली स्तुती


मुंबईकर शार्दुलची विराट रोहलीनं मराठीतून केली स्तुती
SHARES

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या धमदार खेळीच्या जोरावर भारतानं विजय मिळवला. अखेरच्या व निर्णायक समान्यात वेस्ट इंडिजनं ३१६ धावांचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं होतं. वेस्ट इंडिजनं विजयासाठी दिलेलं ३१६ धावांचं आव्हान भारतीय संघानं ४ गडी राखत पूर्ण केलं.

मोलाचं योगदान

कर्णधार विराट कोहली, सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांची अर्धशतकं ही भारतीय संघाच्या विजयाची वैशिष्ट्यं ठरली. मात्र, मुंबईकर शार्दुल ठाकूर अंतिम सामन्यात संघासाठी टर्निंग पॉंइट ठरला आहे. मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत शार्दुलनं भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. शार्दुल ठाकुरच्या या खेळीवर कर्णधार विराट कोहली खुश झाला आहे. विराटने आपल्या ट्विटरवर शार्दुलसोबत एक फोटो टाकत, तुला मानलं रे ठाकूर ! अशी मराठीतून कॅप्शन देत त्याचं कौतुक केलं.

८५ धावांवर बाद

या सामन्यात शार्दुल ठाकूरनं ६ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने १७ धावा केल्या. कर्णधार विराटने रविंद्र जाडेजाच्या साथीनं एक बाजू लावून धरत भारताला विजयाच्या जवळ नेलं. मात्र, विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना कोहली ८५ धावांवर बाद झाला. परंतु, विराटनंतर फलंदाजीसाठी आलेल्या शार्दुल ठाकुरनं चांगली फलंदाजी करत संघाला विजयाच्या दिशेनं नेलं.



हेही वाचा -

शरद पवारांच्या 'त्या' मागणीला रामदास आठवलेंचा पाठिंबा

ज्येष्ठ वकिलाच्या घरी लाखोंचा जुगार, आठ जणांना अटक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा