Advertisement

कृणाल पंड्याच्या विवाहसोहळ्याला या दिग्गजांची उपस्थिती


कृणाल पंड्याच्या विवाहसोहळ्याला या दिग्गजांची उपस्थिती
SHARES

भारताचा कर्णधार विराट कोहलीचं दुसरं रिसेप्शन मंगळवारी मुंबईतील सेंट रेगिस हाॅटेलमध्ये पार पडल्यानंतर पुढच्याच दिवशी मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याच्या लग्नाची लगबग सुरू झाली. बुधवारी मुंबईतील जे. डब्ल्यू मेरियट हाॅटेलमध्ये कृणाल अापली मैत्रीण पंखुरी शर्मा हिच्याशी विवाहबद्ध झाला. भारताचा डॅशिंग फलंदाज हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ असलेल्या कृणालच्या विवाहसोहळ्याला क्रिकेटजगतातील दिग्गजांसह बाॅलीवूड अभिनेत्यांनीही हजेरी लावली होती.

मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ उपस्थित

मुंबई इंडियन्सचे मालक मुकेश अंबानी हे अापल्या कुटुंबासह कृणाल पंड्याला शुभेच्छा देण्यासाठी हजर होते. त्याचबरोबर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांनीही विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. त्याचबरोबर लोकेश राहुल, पार्थिव पटेल, जयदेव उनाडकट, इरफान पठान अाणि अक्षर पटेल या क्रिकेटपटूंसह किरण मोरे, प्रवीण अमरे हे मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमधील माजी क्रिकेटपटूही उपस्थित होते.


बिग बींनी दिल्या शुभेच्छा

बाॅलीवूडचे शहेनशहा बिग बी म्हणजेच अमिताभ हेसुद्धा कृणाल पंड्याला शुभेच्छा देण्यासाठी हजर होते. त्याचबरोबर बाॅलीवूडमधील अनेक मान्यवरांसह ईली अवराम हीसुद्धा उपस्थित होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा