'हा' विक्रम रचणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला

भारतीय संघाचा सलामीवर फलंदाज रोहित शर्मानं नव्या विक्रमाची नोंद आपल्या नावे केली आहे.

SHARE

भारतीय संघाचा सलामीवर फलंदाज रोहित शर्मानं नव्या विक्रमाची नोंद आपल्या नावे केली आहे. रोहित शर्मानं सलामीवीर म्हणून पहिल्याच कसोटी सामन्यात शतक ठोकून नवा विक्रम रचला आहे. त्याशिवाय, एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून शतक ठोकणारा रोहित शर्मा हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.

७ फलंदाज

याआधी जगभरात आतापर्यंत ७ फलंदाजांनी हा विक्रम रचला आहे. परंतु, एकाही भारतीय फलंदाजानं हा विक्रम केला नव्हता. मात्र, रोहित शर्मानं ही कामगिरी करत एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. रोहित शर्मा हा एकदिवसीय व टी-२० क्रिकेटसाठी उत्तम फलंदाज मानला जातो. कसोटीमध्ये त्याला अद्याप फारसं यश मिळालं नव्हतं.

२७ शतकं

वनडे क्रिकेटमध्ये रोहितनं आतापर्यंत २७ शतकं ठोकली आहेत. त्यातील तब्बल २५ शतकं त्यानं सलामीला येऊन केली आहेत. तर, टी-२० क्रिकेटमध्ये त्यानं सलामीला खेळताना ४ शतकं ठोकली आहेत. हा एक विश्वविक्रम आहे. सध्या  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत रोहितनं हा विक्रम रचला आहे. 

तिन्ही फॉरमॅटमध्ये शतकं

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतकं ठोकणाऱ्यांमध्ये रोहित शर्मासोबत वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल, न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्कलम, मार्टिन गप्टिल, श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान, पाकिस्तानचा अहमद शहजाद, ऑस्ट्रेलियाचे शेन वॉटसन आणि बांगलादेशचा तमीम इकबाल यांचा समावेश आहे.हेही वाचा -

महापौर विश्वनाथ महाडेश्वर वांद्रेतून रिंगणात

‘आरे’ कारशेडचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने फेटाळल्या सर्व याचिकासंबंधित विषय
ताज्या बातम्या