Advertisement

महापौर विश्वनाथ महाडेश्वर वांद्रेतून रिंगणात

२०१५ मध्ये बाळा सावंत यांचे निधन झाले. त्यावेळी झालेल्या पोट निवडणूकीत पक्षाने बाळा सावंत यांच्या पत्नी विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली. त्याला काँग्रेसमधून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आवाहन दिले होते.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर वांद्रेतून रिंगणात
SHARES

वांद्रे पूर्व मतदारसंघातून  यंदा मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार कै. बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत या पोट निवडणूकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभ करून निवडून आल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निवडणूकी पक्ष पून्हा संधी देईल अशी त्यांना आशा होती. मात्र तृप्ती सावंत यांना डावलून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिल्याने त्या नाराज आहेत.

वांद्रे पूर्व सुरूवातीपासून शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळख जातो. या बालेकिल्ल्यात काम आणि दांडग्या जनसंपर्कच्या आधारे शिवसेनेचे माजी आमदार बाळा सावंत हे पाय रोवून होते. मात्र २०१५ मध्ये बाळा सावंत यांचे निधन झाले. त्यावेळी झालेल्या पोट निवडणूकीत पक्षाने बाळा सावंत यांच्या पत्नी विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली. त्याला काँग्रेसमधून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आवाहन दिले होते. मात्र या निवडणूकीत नारायण राणे यांचा सावंत यांनी दारून पराभव केला होता.  त्या जोरावरच पक्ष पून्हा एकदा संधी देईल अशी आशा तृप्ती सावंत यांना होती.

मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेरच्या क्षणी तृप्ती सावंत यांना डावलून विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली.  त्यामुळे नाराज झालेल्या वांद्रे पूर्व खेरवाडीच्या विद्यमान शिवसेना आमदार तृप्ती सावंत यांनी बंड केल्याचं चित्र आहे. समर्थकांच्या पाठिंब्याने थोड्याच वेळात तृप्ती सावंत या अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे बोलले जाते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा