Advertisement

IPL 2020: अखेर मुंबई इंडियन्सचं ठरलं, रोहित शर्मा 'या' क्रमांकावर येणार बॅटिंगला


IPL 2020: अखेर मुंबई इंडियन्सचं ठरलं, रोहित शर्मा 'या' क्रमांकावर येणार बॅटिंगला
SHARES

आयपीएलचा तेरावा हंगामाला येत्या शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ कसून सराव करत आहेत. यंदा आयपीएलचा प्रथम सामना गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रंगणार आहे. १९ सप्टेंबर संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून या संघामधील चुरस पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे  मुंबई इंडियन्सच्या संघात यंदा रोहित शर्मा, क्विंटन डी-कॉक आणि ख्रिस लिन असे ३ मातब्बर खेळाडू असल्यामुळे सलामीला कोणत्या जोडीला पसंती द्यायची हा यक्षप्रश्न मुंबईच्या संघ व्यवस्थापनासमोर होता. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने या प्रश्नाचं उत्तर दिलं असून तेराव्या हंगामात आपण सलामीला येणार असल्याचं जाहीर केलं आहे.

सलामीच्या सामन्याआधी व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स दरम्यान रोहितने याबद्दल माहिती दिली. या मुलाखतीत रोहित यानं मी गेल्या वर्षी संपूर्ण स्पर्धेत सलामीला आलो होतो आणि यंदाही मीच सलामीला येणार आहे. पण संघाला जशी गरज असेल तसे सर्व पर्याय मी खुले ठेवणार आहे.

ख्रिस लिन संघात आल्यामुळे मुंबई इंडियन्स क्विंटन डी-कॉक सोबत रोहित शर्माला संधी देणार की ख्रिस लिनला संधी देणार यावरुन बरीच चर्चा सुरु होती. अखेरीस या चर्चेला रोहित शर्मानेच पूर्णविराम दिला आहे. एखाद्या सामन्यात प्रयोग करायचा ठरल्यास ख्रिस लिन किंवा इशान किशन यासारख्या खेळाडूंना सलामीला संधी देण्यात येईल असंही रोहितने स्पष्ट केल्याची माहिती मिळते.

कोरोनामुळं यंदाच्या स्पर्धेचं आयोजन हे युएईत करण्यात आलेलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईच्या नावावर आतापर्यंत ४ विजेतेपदं जमा आहेत, तर चेन्नईने ३ वेळा स्पर्धेत बाजी मारली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement