Advertisement

भारतीय संघ अाशिया चषकासाठी दुबईला रवाना


भारतीय संघ अाशिया चषकासाठी दुबईला रवाना
SHARES

जवळपास दोन महिन्यांच्या प्रदीर्घ इंग्लंड दौऱ्यानंतर अाता भारतीय क्रिकेट संघासमोर अाता अाशिया चषकाचे अाव्हान येऊन ठेपले अाहे. अाशियातील दिग्गज संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व मुंबईच्या रोहित शर्माकडे सोपविण्यात अाले अाहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या अाशिया चषकासाठी भारतीय संघ गणपती बाप्पाचे अाशीर्वाद घेऊन दुबईला रवाना झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची पहिली तुकडी गुरुवारी रात्री दुबईला रवाना झाली. अायपीएलमधील हॅमस्ट्रिंग दुखापतीतून सावरलेला केदार जाधव भारतीय संघात पुनरागमन करत असून तोसुद्धा दुबईला रवाना झाला अाहे. केदारनं दुबईला रवाना होत असल्याचं ट्विट केलं अाहे.



हे खेळाडू रवाना

कर्णधार रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायडू, मनीष पांडे, केदार जाधव, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार अाणि खालिद अहमद हे खेळाडू पहिल्या तुकडीत रवाना झाले अाहेत. दुसऱ्या तुकडीत शिखर धवन, लोकेश राहुल, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमरा अाणि शार्दूल ठाकूर हे खेळाडू रवाना होणार अाहेत.


भारताची सलामी हाँगकाँगशी

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची खरी परीक्षा लागणार असली तरी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया चौथ्यांदा अाशिया चषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाली अाहे. भारताचा पहिला सामना मंगळवार १८ सप्टेंबर रोजी हाँगकाँगशी होणार अाहे. त्यानंतर अाशिया चषकातील हाय व्होल्टेज मॅच म्हणजे भारत-पाकिस्तान सामना बुधवार १९ सप्टेंबर रोजी रंगणार अाहे.


हेही वाचा -

अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या १९ वर्षांखालील संघात निवड

'बाॅक्सिंग रिंगचा किंग' माइक टायसन मुंबईत येणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा