Advertisement

'बाॅक्सिंग रिंगचा किंग' माइक टायसन मुंबईत येणार


'बाॅक्सिंग रिंगचा किंग' माइक टायसन मुंबईत येणार
SHARES

'बाॅक्सिंग रिंगचा किंग' म्हणून अोळखला जाणारा अमेरिकेचा माजी वादग्रस्त हेवीवेट बाॅक्सिंग चॅम्पियन माइक टायसन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार अाहे. मुंबईत २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कुमिते १ लीग या पहिल्यावहिल्या फाइट नाइटसाठी टायसन मुंबईत येणार अाहे. अाॅल इंडिया मिक्स मार्शल अार्टस फेडरेशनच्या विद्यमाने होणाऱ्या या अांतरराष्ट्रीय मिक्स मार्शल अार्टस लीगच्या प्रसारासाठी ते मुंबईत येत अाहेत.


माइक टायसन हे या लीगचे सल्लागार अाहेत. मिक्स मार्शल अार्ट हा नवीन खेळ असून अातापर्यंत या खेळाला कोणताही चेहरा नव्हता. पण अाता माइक टायसन या महान बाॅक्सरच्या रूपाने या खेळाला चेहरा मिळाला अाहे. काॅम्बॅट स्पोर्टमध्ये मोहम्मद अलीनंतर टायसन यांचा क्रमांक लागतो. त्यांनाच अाम्ही करारबद्ध केले अाहे.
- मोहम्मदेली बुधवानी, कुमिते १ लीगचे संस्थापक


असे असेल स्वरूप

पदार्पणाच्या या लीगमध्ये अाठ संघांचा समावेश असून हे संघ विविध देशांचे प्रतिनिधित्व करतील. प्रत्येक संघात एकूण नऊ फायटर्स असतील, त्यात दोन महिलांचा समावेश असेल. ही लीगमध्ये मिक्स मार्शल अार्टचा वर्ल्डकप असेल, असा दावा बुधवानी यांनी केला असून लीगविषयीची सविस्तर घोषणा नंतर केली जाईल.


हेही वाचा -

हाॅकी वर्ल्डकप जिंकण्याची भारतीय संघात क्षमता - धनराज पिल्ले

मुंबईत रंगणार इंडो इंटरनॅशनल प्रीमिअर कबड्डी लीग



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा