Advertisement

कसोटी क्रमवारीत रोहीत शर्मा-मयांक अग्रवाल यांची सुधारणा


कसोटी क्रमवारीत रोहीत शर्मा-मयांक अग्रवाल यांची सुधारणा
SHARES

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम इथं झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं २०३ धावांनी दक्षिण आफ्रिकेवर मात केली. या विजयासह भारत या मालिकेत १-० नं आघाडी घेतली आहे. तसंच, या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्मानं दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी केली. या शतकी खेळीसह त्यांनं आपली निवड सार्थ ठरवली आहे. त्याचप्रमाणं, मयांक अग्रवालनंही पहिल्या डावात द्विशतक झळकावत रोहितला उत्तम साथ दिली होतीरोहित शर्मानं विशाखापट्टणम कसोटीत पहिल्या डावात १७६ तर दुसऱ्या डावात १२७ धावा केल्या होत्या. 

क्रमवारीत वाढ 

रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी केलेल्या या उत्तम कामगिरीमुळं त्यांच्या क्रमवारीत वाढ झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत रोहितनं १७ व्या स्थानावर झेप घेतली असून, कसोटी कारकिर्दीतलं रोहितचं हे सर्वोत्तम स्थान मानलं जात आहे. तसंच, मयांक अग्रवालनंही आपल्या क्रमवारीत ३८ स्थान झेप घेत थेट २५ वं स्थान पटकावलं आहे. याव्यतिरीक्त भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपलं दुसरं तर ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.

सर्वोत्तम १० गोलंदाज

फलंदाजांसह गोलंदाजांमध्ये देखील फिरकीपटू रविचंद्रन आश्विननं सर्वोत्तम १० गोलंदाजांमध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात आश्विननं ८ बळी घेतले. आश्विन १४ व्या स्थानावरुन १०व्या स्थानावर आला आहे. तर दुसऱ्या डावात ५ बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीच्या स्थानातही सुधारणा झाली असून तो १८ वरुन १६ व्या स्थानी आला आहे.



हेही वाचा -

SBI चं कर्ज झालं स्वस्त, पण ठेवींवरील दरही घटले

मालवणीत ४७ वर्षीय महिलेची हत्या



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा