Advertisement

आयपीएलपूर्वीच रोहित शर्माची दमदार फटकेबाजी


आयपीएलपूर्वीच रोहित शर्माची दमदार फटकेबाजी
SHARES

आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी सर्व संघ कसून सराव करत आहेत. आयपीएलसाठी सर्व संघ यूएईमध्ये दाखल झाले आहेत. १९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होत असून, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा कसून सराव करत आहे. याबाबत, एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये रोहित फलंदाजी करत असल्याचं दिसत आहे.

१९ सप्टेंबर रोजी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ या सामन्यासाठी अबु धाबी येथे सराव करत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सरावादरम्यान…आगामी सामन्यांमध्ये आपण कशा प्रकारची खेळी करणार आहोत याची एक झलक दाखवून दिली.

शेख झायेद स्टेडीयमवर सराव करत असताना रोहितने मारलेला षटकार थेट मैदानाबाहेर गेला आणि मैदानाबाहेरुन जाणाऱ्या एका धावत्या बसला चेंडू लागला. मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया पेजवर रोहितच्या या फटकेबाजीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

लॉकडाउनच्या काळात क्रिकेटपटू प्रदीर्घ काळ मैदानापासून दुरावले होते. त्यामुळे सलामीच्या सामन्यात मुंबईचा संघ कशी कामगिरी करतो आणि रोहित शर्मा आपल्या लौकिकाला साजेशी फटकेबाजी करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement