Advertisement

IPL 2021: अटीतटीच्या सामन्यात आरसीबीची मुंबई इंडियन्सवर विजय

बंगळुरूनं मुंबईवर २ विकेट ठेवत मात केली. बंगळुरुच्या विजयात हर्षल पटेलनं महत्त्वाची कामगिरी बजावली असून, शेवटच्या चेंडूवर बंगळूरुनं विजय मिळवला आहे.

IPL 2021: अटीतटीच्या सामन्यात आरसीबीची मुंबई इंडियन्सवर विजय
SHARES

गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा (mumbai indians) पराभव करत विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (Royal challengers bangluru) आयपीएलच्या १४व्या पर्वात विजयी सुरुवात केली आहे. बंगळुरूनं मुंबईवर २ विकेट ठेवत मात केली. बंगळुरुच्या विजयात हर्षल पटेलनं महत्त्वाची कामगिरी बजावली असून, शेवटच्या चेंडूवर बंगळूरुनं विजय मिळवला आहे.

या पराभवानंतर मुंबई इंडियन्सनं एक परंपरा मात्र कायम ठेवली. ती परंपरा म्हणजे सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याची. गेल्या सलग ९ आयपीएल (IPL 2021) पर्वात मुंबईचा सलामीच्या सामन्यात पराभव झाला आहे.

सलामीच्या सामन्यात मुंबईचं बंगलोरसमोर १६० धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबई इंडियन्सनं ९ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या होत्या. मुंबईकडून (Mumbai) सलामीवीर ख्रिस लीननं सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर सुर्यकुमार यादव, ईशान किशन यांच्या उपयुक्त खेळीमुळं संघाची धावसंख्या पर्यंत पोहोचली. मुंबई इंडियन्सची सुरुवात संथ गतीनं झाली. कर्णधार रोहित शर्मानं चांगली सुरुवात केली मात्र १९ धावांवर तो धावबाद झाला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं शानदार ३१ धावांची खेळी केली.

ख्रिस लीनचं अर्धशतक एका धावेनं हुकलं. त्याला वॉशिंग्टननं ४९ धावांवर बाद केलं. त्यानंतर ईशान किशननं १९ चेंडूत २८ धावा केल्या. तर हार्दिक पांड्या १३ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला क्रुणाल पांड्यानं क्रुणालनं ०७ धावा केल्या. तर पोलार्डनं ०७ धावा केल्या. बंगळुरुकडून हर्षल पटेलनं शानदान गोलंदाजी केली. त्यानं ५ विकेट्स घेतल्या. २ तर जॅमिसन आणि वॉशिंग्टन सुंदरनं १-१ विकेट घेतली.

२०१३पासून मुंबईचा पहिल्या सामन्यात विजय

  • २०१३ - आरसीबी
  • २०१४ - केकेआर
  • २०१५ - केकेआर
  • २०१६ - आरपीएस
  • २०१७ - आरपीएस
  • २०१८ - सीएसके
  • २०१९ - डीसी
  • २०२० - सीएसके 
  • २०२१ - आरसीबी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा