Advertisement

अंध क्रिकेटपटूंच्या मान्यतेसाठी मास्टरब्लास्टरचं बीसीसीअायला साकडं


अंध क्रिकेटपटूंच्या मान्यतेसाठी मास्टरब्लास्टरचं बीसीसीअायला साकडं
SHARES

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर अाता अंध क्रिकेटपटूंच्या मदतीसाठीही धावून अाला अाहे. क्रिकेट असोसिएशन फाॅर द ब्लाइंड इन इंडिया (सीएबीअाय) या संघटनेला मान्यता देण्यासाठी अाणि त्यांना बीसीसीअायच्या पेन्शन योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी सचिन तेंडुलकरनं बीसीसीअायला साकडं घातलं अाहे.


सचिनचं प्रशासकीय समितीला पत्र

काही दिवसांपूर्वीच भारताच्या अंध क्रिकेट संघानं अंतिम फेरीत पाकिस्तानला दोन विकेट्सनी हरवून अंध विश्वचषकावर नाव कोरलं होतं. त्यावेळीही सचिननं भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीची प्रशंसा केली होती. अाता सचिननं प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांना पत्र लिहून सीएबीअायला मान्यता देण्याचा विचार करण्यात यावा, अशी मागणी केली अाहे.


अंध विश्वचषक स्पर्धेत भारत चौथ्यांदा विश्वविजेता ठरल्याचा जल्लोष करायला हवा. बीसीसीअायने अाता अंध क्रिकेट असोसिएशनला मान्यता देण्यासाठी विचार करावा, अशी विनंती मी करत अाहे. या संघाने अनेक अडथळ्यांवर मात करत देशाचे नाव उंचावले अाहे. हा विजय प्रेरणादायी अाहे.
- सचिन तेंडुलकर, महान क्रिकेटपटू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा