Advertisement

वरळी पिच स्मॅशर्सचा चेंबूर स्ट्रायकर्सवर पाच विकेट्सनी विजय


वरळी पिच स्मॅशर्सचा चेंबूर स्ट्रायकर्सवर पाच विकेट्सनी विजय
SHARES

मरीन ड्राइव्ह येथील पोलीस जिमखान्यावर सुरू असलेल्या साई मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीग टी-२० स्पर्धेत वरळी पिच स्मॅशर्सने विजयी घोडदौड कायम राखली अाहे. मंगळवारी रात्री रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात वरळी संघाने चेंबूर स्ट्रायकर्सचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवत अ गटात ६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले अाहे.


वरळी पिच स्मॅशर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वरळीच्या गोलंदाजांनी मात्र हा निर्णय सार्थ ठरवला. सांताक्रूझचे पहिले तीन फलंदाज पंकज असराणी (१), रोहन सुर्वे (०) अाणि सुरज ललवानी (८) यांना स्वस्तात माघारी पाठवत वरळीने सामन्यावर पकड मिळवली. मात्र अादित्य खानोलकर अाणि अोझी थाॅमस यांच्या सुरेख फलंदाजीमुळे चेंबूरला १७ षटकांत ७ बाद १३२ अशी मजल मारता अाली. अादित्यने २५ तर थाॅमसने ४१ धावांची खेळी केली.


हा सामना जिंकण्यासाठी चेंबूरला सुरुवातीलाच विकेट्सची अावश्यकता होती. चार्लस सॅम (३), सिद्धराज गोवेकर (०) अाणि केतन चौधरी (७) या वरळीच्या फलंदाजांना झटपट बाद करत चेंबूरने सामन्यात रंगत अाणली. मात्र अजोय सिंग अाणि रोहन डिसूझा यांच्यातील भागीदारी सामन्याला कलाटणी देणारी ठरली. अजोय सिंगने अवघ्या २९ चेंडूंत ७ चौकार अाणि ४ षटकार ठोकत ६५ धावा फटकावल्या. त्याची हीच खेळी वरळीला विजयी ठरवण्यात महत्त्वाची ठरली. रोहनने ३० धावांचे योगदान दिले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा