Advertisement

एमएमपीएलमध्ये सांताक्रूझ क्रॅकर्सचा दणदणीत विजय


एमएमपीएलमध्ये सांताक्रूझ क्रॅकर्सचा दणदणीत विजय
SHARES

रोहन सदरजोशीच्या अष्टपैलू कामगिरीमुळे सांताक्रूझ क्रॅकर्सने साई मुंबई मास्टर्स टी-२० लीगमध्ये मुलुंड मास्टर ब्लास्टर्सवर १४७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. रोहनच्या नाबाद ९३ धावांच्य खेळीमुळे सांताक्रूझ क्रॅकर्सने १७ षटकांत ३ बाद २३५ धावांचा डोंगर उभा केला. रोहनने ४२ चेंडूंत १४ चौकार अाणि ४ षटकारांची अातषबाजी केली. रोहनला मिलिंद दरेकर (४६) अाणि मेहूल कामत (३६) यांनीही चांगली साथ दिली. हे भलंमोठं उद्दिष्ट पार करताना मुलुंड मास्टर ब्लास्टर्सची फलंदाजी अक्षरशः पत्त्याच्या डावाप्रमाणे कोसळली. त्यांचा डाव १४.५ षटकांत ८६ धावांवर अाटोपला. त्यातही रोहनने दोन विकेट्स मिळवत सामनावीराच्या पुरस्कारावर नाव कोरलं.


रोहन का जादू चल गया

मेहूल कामत अाणि अमेय कोठावळे यांनी सांताक्रूझ क्रॅकर्सला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर कळस चढवण्याचं काम रोहन अाणि मिलिंद दरेकर यांनी केलं. या दोघांनी ११७ धावांची भागीदारी करून मुलुंड मास्टर ब्लास्टर्सच्या अाक्रमणातील हवाच काढून घेतली. रोहनने नाबाद ९३ धावांची तडाखेबंद खेळी केली.


मनोज सहानी, संदीप त्रिपाठीची भेदक गोलंदाजी

सांताक्रूझ क्रॅकर्सचे २३६ धावांचे लक्ष्य गाठताना मुलुंड मास्टर ब्लास्टर्सच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. मनोज सहानी अाणि संदीप त्रिपाठीच्या भेदक गोलंदाजीसमोर मुलुंडचा डाव ८६ धावांवर गडगडला अाणि सांताक्रूझने १४९ धावांनी दमदार विजय साकारला. मनोजने चार तर संदीपने तीन फलंदाजांना माघारी पाठवले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा