Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

एमएमपीएलमध्ये बोरीवली वाॅरियर्सचा ९१ धावांनी दणदणीत विजय


एमएमपीएलमध्ये बोरीवली वाॅरियर्सचा ९१ धावांनी दणदणीत विजय
SHARES

मरीन ड्राइव्ह इथल्या पोलीस जिमखान्यावर रविवारी चौकार-षटकारांची अातषबाजी पाहायला मिळाली. साई मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात बोरीवली वाॅरियर्सने शाहिन मेस्त्री अाणि लवेश मेहरा यांच्या धुव्वाधार फलंदीजाच्या जोरावर निर्धारित षटकांत ६ बाद २४६ धावांचा डोंगर उभा केला. अशक्यप्राय असे हे अाव्हान पार करताना चेंबूर स्ट्रायकर्सची दाणादाण उडाली. त्यामुळे त्यांना ७ बाद १५५ धावांपर्यंतच मजल मारता अाली.  त्यामुळे बोरीवली वाॅरियर्सने अापल्या पहिल्याच सामन्यात ९१ धावांनी विजय मिळवत दणदणीत सलामी दिली. चेंबूरचा स्टार फलंदाज अादित्य खानोलकर या सामन्यात मात्र अपयशी ठरला. चेंबूर स्ट्रायकर्सचा हा तीन सामन्यांतील दुसरा पराभव ठरला.


शाहिन, लवेशने 'धो डाला'

बोरीवलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बोरीवलीने दमदार सुरुवात केली. शाहिन मेस्त्रीने सुरुवातीपासूनच अाक्रमक फलंदाजी करत अवघ्या २७ चेंडूंत ८ चौकार अाणि ४ षटकारांसह ६४ धावांची खेळी करून बोरीवलीच्या डावाची पायाभरणी केली. त्याला संकेत कानकोनकर याने मोलाची साथ देताना ४४ धावा फटकावल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या लवेश मेहराने तुफानी फटकेबाजी करून संघाला दोनशे धावांचा टप्पा अोलांडून दिला. त्याने ३३ चेंडूंत ८ चौकार अाणि ४ षटकारांची अातषबाजी करत नाबाद ६८ धावा कुटल्या. त्यामुळे बोरीवलीने ७ बाद २४६ धावा उभारल्या.


चेंबूरच्या फलंदाजांची शरणागती

२४५ धावांचे उद्दिष्ट गाठताना चेंबूर स्ट्रायकर्सची घसरगुंडी उडाली. चेंबूरच्या एकाही फलंदाजाला मैदानावर टिकाव धरता न अाल्याने त्यांची ६ षटकांत ६ बाद ५६ अशी स्थिती झाली होती. नील धानकनी याने एक बाजू लावून धरताना  नाबाद ५१ धावा केल्या. मात्र चेंबूरला विजयासाठी ९१ धावा कमी पडल्या.


हेही वाचा - 

शिवाजी पार्कची 'सुपरस्टार' कामगिरी, मुलुंड मास्टरब्लास्टरवर 41 धावांनी विजय


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा