Advertisement

श्रेयसने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावं, कुंबळेचा सल्ला

भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावं, असा सल्ला भारताचा अनुभवी गोलंदाज आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे याने दिला आहे. येत्या रविवारपासून भारत-वेस्ट इंडिजदरम्यान वन-डे मालिकेला सुरूवात होत आहे.

श्रेयसने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावं, कुंबळेचा सल्ला
SHARES

भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावं, असा सल्ला भारताचा अनुभवी गोलंदाज आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे याने दिला आहे. येत्या रविवारपासून भारत-वेस्ट इंडिजदरम्यान वन-डे मालिकेला सुरूवात होत आहे.

कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी २० मालिकेत वेस्ट इंडिजला २-१ ने धूळ चारली. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि के.एल. राहुलने तडाखेबंद फलंदाजी केली. परंतु या मालिकेत श्रेयस अय्यरला फलंदाजीसाठी म्हणावी तशी संधी मिळू शकली नाही. कोहलीने श्रेयसऐवजी ऋषभ पंतवर विश्वास दाखवत त्यालाच चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली. परंतु पंतला या मालिकेतही चमकदार कामगिरी करून दाखवता आली नाही.

त्यामुळे वेस्ट इंडिजविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत श्रेयसला चौथ्या क्रमांकावर जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळावी, असं मत कुंबळेने व्यक्त केलं आहे. या मालिकेत शिखर धवन दुखापतीमुळे खेळणार नसल्याने राहुल डावाची सुरूवात करेल. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने श्रेयसवर अधिक विश्वास दाखवला पाहिजे. श्रेयस परिपक्व फलंदाज असून तो मिळालेल्या संधीचं नक्कीच सोनं करेल, असा विश्वास कुंबळेने व्यक्त केला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा