Advertisement

सौरव गांगुली BCCI चा नवा अध्यक्ष


सौरव गांगुली BCCI चा नवा अध्यक्ष
SHARES

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेट विश्वात 'दादा' अशी ओळख असणाऱ्या सौरव गांगुली यानं बीसीसीआयचं अध्यक्षपद स्विकारलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ बुधवारी संपुष्टात आला. त्यानंतर, बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात आली. तसंच, त्याची बिनविरोध नियुक्ती देखील करण्यात आली.

गांगुलीची नियुक्ती

बीसीसीआयच्या च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली या दोघांच्या नावांची चर्चा होती. परंतु, १४ ऑक्टोबर रोजी केवळ सौरव गांगुलीनंच अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळं बीसीसीआय च्या अध्यक्षपदी गांगुलीची नियुक्ती होणार हे निश्चित झालं होतं.


वार्षिक सर्वसाधारण सभा 

गांगुलीच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी होणार आहे. गांगुलीसोबतच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह यानं बीसीसीआय च्या सचिवपदाचा आणि बीसीसीआय चे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमाळ यांनी बीसीसीआय च्या कोषाध्यक्षपदाचा पराभव स्वीकारला. त्यांचीही निवड बिनविरोध झाली.


निवडणूक बिनविरोध

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध पार पडावी, यासाठी विविध राज्य संघटनांनी मुंबईत एक अनौपचारिक बैठक घेतली होती. त्यात अध्यक्षपदासाठी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या नावाची चर्चा होती.



हेही वाचा -

दिवाळीसाठी एसटीच्या ३५९ विशेष जादा बस

दिवाळीनिमित्त तुतारी एक्स्प्रेसला चार अतिरिक्त डबे



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा