Advertisement

वुमन आयपीएलची ट्रायल, सुपरनोव्हाज संघ विजयी

पुरूषांप्रमाणेच महिलांचंही आयपीएल आयोजित करण्याच्या दृष्टिने बीसीसीआय पावलं उचलत असून त्याची चाचपणी करण्यासाठी या वानखेडेवर प्रदर्शनी सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सामन्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने महिला क्रिकेट खेळाडू खूश दिसत होत्या.

वुमन आयपीएलची ट्रायल, सुपरनोव्हाज संघ विजयी
SHARES

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोव्हाज या महिलांच्या टी २० प्रदर्शनी सामन्यात हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हाज संघाने स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्स संघाचा ३ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात सुपरनोव्हाज संघाने नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

किती धावांचं आव्हान?

कर्णधार स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ट्रेलब्लेझर्स संघाने सुपरनोव्हाज संघासमोर २० षटकांत १३० धावांचं लक्ष ठेवलं. ट्रेलब्लेझर्सकडून सुएज बॅटेज (३२) आणि जिमाह राॅड्रिग्ज (२५) या दोघींव्यतीरिक्त कुणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

लक्ष्य सहज पार

तर, १३० धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सुपरनोव्हाज संघाने ओपनर मिताली राज (२२) आणि डॅनियल वॅट्ट (२४) या दोघींसोबतच हरमनप्रीत कौर (२१) आणि सोफी डिव्हाइन (१९) यांच्या जोरावर सुपरनोव्हाज संघाने हे आव्हान सहज पूर्ण केलं.

मॅन आॅफ द मॅच कुणाला?

या सामन्यात ३ ओव्हरमध्ये १६ रन्स देऊन २ विकेट काढणाऱ्या ट्रेलब्लेझर्स संघाच्या सूजी बेत्सला 'प्लेअर ऑफ द मॅच' हा पुरस्कार देण्यात आला.

मॅचला चांगला प्रतिसाद

पुरूषांप्रमाणेच महिलांचंही आयपीएल आयोजित करण्याच्या दृष्टिने बीसीसीआय पावलं उचलत असून त्याची चाचपणी करण्यासाठी या वानखेडेवर प्रदर्शनी सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सामन्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने महिला क्रिकेट खेळाडू खूश दिसत होत्या.

हेही वाचा-

अायपीएलच्या फायनलची काॅमेंट्री अाता मराठीतही!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा