Advertisement

Corona virus : कोरोना संसर्गाबाबत सुरेश रैनाने दिला हा सल्ला

बीसीसीआयने आयपीएलसह अनेक महत्वाच्या स्थानिक स्पर्धा रद्द केल्या

Corona virus : कोरोना संसर्गाबाबत सुरेश रैनाने दिला हा सल्ला
SHARES

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारताच्या प्रमुख शहरांमध्ये प्रत्येक दिवशी नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. केंद्र सरकार व इतर संबंधित यंत्रणा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीची ठिकाणे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. काही महत्वाच्या शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. देशातील महत्वाच्या क्रीडा स्पर्धांनाही कोरोनाचा फटका बसला आहे. 

हेही वाचाः- Corona virus : आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचे नुकसान

बीसीसीआयने आयपीएलसह अनेक महत्वाच्या स्थानिक स्पर्धा रद्द केल्या आहेत. २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा आता १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. अनेक संघांनी कोरोनाच्या धसक्यामुळे आपले ट्रेनिंग कँप रद्द केले आहेत. चेन्नई सुपरकिंग्जनेही आपला कँप रद्द केला आहे. चेन्नईचा महत्वाचा खेळाडू सुरेश रैनानेही आपल्या चाहत्यांना कोरोनाविषयी कोणत्याही अफवा पसरवू नका आणि योग्य ती काळजी घ्या असं आवाहन केले आहे. त्या आधी भारताचा सलामवीर रोहित शर्मा याने कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले होते. 


हेही वाचाः-Coronavirus Updates: टोल नाक्यावर ड्रायव्हर, प्रवाशांची नॉर्मल स्क्रिनींग

पाकिस्तानात सुरू असलेल्या सुपर लिगवर कोरोनाचे सावट आहे. इंग्लडचा वादग्रस्त खेळाडू अँलेक्स हेल्स याला ही  कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त आहे. कोरोनाचे हे सावट लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएल खेळवण्याला स्थगिती दिली आहे. देशात सध्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शंभरीपार गेला आहे. महाराष्ट्रात एका रुग्णाला कोरोनामुळे आपले प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे आगामी काळात सरकारी यंत्रणा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा