Coronavirus cases in Maharashtra: 668Mumbai: 377Pune: 65Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Navi Mumbai: 22Nagpur: 17Ahmednagar: 17Pimpri Chinchwad: 16Thane: 15Panvel: 11Latur: 8Vasai-Virar: 6Buldhana: 5Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Palghar: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Nashik: 1Washim: 1Amaravati: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 32Total Discharged: 52BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

Corona virus : आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचे नुकसान

बीसीसीआयने कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा १३वी आवृत्ती १५ एप्रिलपर्यंत स्थगित केली आहे

Corona virus : आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचे नुकसान
SHARE

कोरोना व्हायरस जगभरात वेगाने पसरत चालला आहे. अनेक देशात यामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. याचा फटका अन्य क्षेत्रांप्रमाणे क्रीडा क्षेत्राला देखील बसला आहे. जगभरातील मोठय़ा स्पर्धा रद्द अथवा स्थगित केल्या गेल्या आहेत. यातील एक मोठी स्पर्धा म्हणजे आयपीएल होय. बीसीसीआयने कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा १३वी आवृत्ती १५ एप्रिलपर्यंत स्थगित केली आहे.

हेही वाचाः- Coronavirus Updates: टोल नाक्यावर ड्रायव्हर, प्रवाशांची नॉर्मल स्क्रिनींग

या वर्षी आयपीएल स्पर्धा होईल की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. जर स्पर्धा झाली नाही तर बीसीसीआयला थेट ४ हजार कोटींचे नुकसान होईल. अर्थात स्पर्धा होणार की नाही याबद्दल येणार्‍या काळातच समजू शकले. जर सर्व काही ठिक झाले तर एप्रिलच्या मध्य अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ६0 सामन्यांची आयपीएल होऊ शकते. मिनी आयपीएल झाल्यास दिवसांची आणि सामन्यांची संख्या कमी होऊ शकते. तसेच कोरोनचा धोका वाढला आणि परिस्थिती आणखी गंभीर झाली तर आयपीएल रद्द होऊ शकते. अशा परिस्थितीत सर्वांचे नुकसान होईल. जर आयपीएल एप्रिलच्या मध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाल्यास ६0 सामन्यांची स्पर्धा होऊ शकते. असे झाल्यास कमीत कमी नुकसान होईल. प्राइम टाईम कमी मिळाल्यामुळे जाहिरातीपासून मिळणारे उत्पन्न कमी होईल. तसेच काहीही झाले तरी प्रेक्षकांची संख्या कमी ज्यामुळे सर्वात मोठे नुकसान होऊ शकते.

हेही वाचाः-Coronavirus Update: म्हणून कोरोना बळीचा अंत्यविधी पत्नी, मुलाशिवाय...

मिनी आयपीएल झाल्यास थोडे अधिक नुकसान होऊ शकते. ब्रॉडकास्टरनी या सत्रातील ९0 टक्के जाहिरातीचे पैसे दिले आहेत. अशा परिस्थितीत ते पैसे परत करावे लागतील. सध्या चित्रपट गृह आणि सार्वजनिक ठिकाणे बंद आहेत. त्यामुळे टीव्ही आणि इंटरनेटद्वारे अधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. कोरोनाचा धोका वाढला व व आयपीएल रद्द झाल्यास सर्वाधिक नुकसान होईल. यात बीसीसीआय, आयपीएलमधील संघ आणि त्याच्या बरोबर अन्य लोकांचे नुकसान होईल. त्यामुळेच ही स्पर्धा व्हावी असे संघ चालकांचे म्हणणे आहे. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक स्टार इंडिया आणि विवो हे दोघे मिळून प्रत्येक वर्षी ४ हजार कोटी रुपये आणतात. जर स्पर्धाच रद्द झाली तर या दोघांना मोठा फटका बसेल. स्पर्धेतील अधिकारी, अन्य कर्मचारी, इव्हेंट मॅनेजमेंट आणि खेळाडू यांना देखील पैसे द्यावे लागतील. स्पर्धा छोट्या प्रमाणात झाली तर किती सामने होतात त्यावर नुकसान ठरले. जर स्पर्धा झालीच नाही तर आयपीएल स्पर्धेशी संबंधित सर्वांचे काही कोटींमध्ये नुकसान होईल.संबंधित विषय
संबंधित बातम्या