टीम इंडियाला जबर धक्का, गब्बर वर्ल्डकपमधून बाहेर


  • टीम इंडियाला जबर धक्का, गब्बर वर्ल्डकपमधून बाहेर
SHARE

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे वर्ल्डकपबाहेर गेला आहे. त्यामुळे विकेटकिपर बॅट्समन रिषभ पंतचा मार्ग मोकळा झाला आहे. 

शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये शतक ठोकलं होतं. मात्र या मॅचमध्ये पॅट कमिन्सचा उसळता चेंडू त्याच्या अंगठ्याला लागला होता. या मॅचमध्ये शिखर फिल्डिंगसाठीही मैदानात उतरला नव्हता. शिखरची तपासणी केल्यानंतर, तो ३ आठवड्यात दुखापतीतून सावरेल असं संघाचे फिजीओ आणि डॉक्टरांच्या टीमने सांगितलं होतं. त्याच्या अंगठ्याला प्लास्टर करण्यात आल्यावर तो साखळीतील शेवटचे सामने खेळेल, असं म्हटलं जात होतं. 


परंतु पुढील तपासणीत तो दुखापतीतून सावरणार नसल्याचं स्पष्ट झाल्याने त्यानं उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'धवन वर्ल्ड कप खेळण्यासाठी फिट नसून त्याला रिकव्हर होण्यासाठी २ आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागेल. त्यामुळे तो वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेत आहे,'' असं सूत्रांनी स्पष्ट केलं.   

शिखरच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून ऋषभ पंतला इंग्लंडला रवाना करण्यात आलं होतं. शिखरच्या दुखापतीत सुधार होणार नसल्याने आता त्याच्या जागी ऋषभ पंतला संघात जागा देण्यात आली आहे.हेही वाचा-

वर्ल्डकप भारतात आणा! पावसामुळे रद्द होणाऱ्या सामन्यांवर अमिताभ यांचा तोडगा

शिखर धवन दुखापतग्रस्त, ३ आठवड्यांसाठी संघाबाहेरसंबंधित विषय
ताज्या बातम्या