Advertisement

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, सूर्यकुमार यादवचा समावेश

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिका संपल्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. २३ मार्चपासून ही मालिका सुरू होणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, सूर्यकुमार यादवचा समावेश
SHARES

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिका संपल्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. २३ मार्चपासून ही मालिका सुरू होणार आहे.  या मालिकेसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवला एकदिवसीय संघात प्रथमच संधी देण्यात आली आहे. 

इंग्लंडविरोधातील चौथ्या टी-२० सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यानंतर सूर्यकुमारने अर्धशतक साजरे करत आपली नोंद घेण्यास भाग पाडले. विजय हजारे स्पर्धेत धावांची बरसात करणाऱ्या पृथ्वी शॉला मात्र या संघातून वगळण्यात आले आहे. तर आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेला गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. एकदिवशीय मालिकेचे सर्व सामने पुण्यात खेळवले जाणार आहेत. 

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक 

२३ मार्च – पहिला सामना

२६ मार्च – दुसरा सामना

२८ मार्च – तिसरा सामना

भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा