Advertisement

सतीश सबनीस फाऊंडेशन तर्फे मुंबईत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

ऑल इंडिया फिडे कॅपिटल रेटिंग चेस अशी ही टूर्नामेंट आहे.

सतीश सबनीस फाऊंडेशन तर्फे मुंबईत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
SHARES

सतीश सबनीस फाउंडेशन आणि मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामानाने मुंबईत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. ऑल इंडिया फिडे कॅपिटल रेटिंग चेस अशी ही टूर्नामेंट असून 6 एप्रिलला ही स्पर्धा होणार आहे. 

ही स्पर्धा विविध वयोगटातील स्पर्धकांसाठी असून एकूण 3 लाखांहून अधिक रक्कमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. येत्या रविवारी 6 एप्रिल रोजी ही भव्य बुद्धीबळ स्पर्धा पार पडणार आहे. 

मुंबईतील वांद्रे येथील उत्तर भारतीय सेवा संघाच्या सभागृहात ही स्पर्धा पार पडणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून स्पर्धेची पहिली पार फेरी पडणार आहे. विविध वयोगटासाठी ही स्पर्धा पार पडणार आहे.

बक्षिस : 3,25,200 आणि जवळपास 70 ट्रॉफी


स्थळ : उत्तर भारतीय संघ, प्लॉट नंबर 629/1243, टिचर कॉलनीच्या मागे

तारीख : 6 एप्रिल 2025

वेळ : सकाळी 8 पासून



हेही वाचा

अजिंक्य रहाणेच्या स्पोर्ट्स अकादमीसाठी वांद्रेतील भूखंड भाड्याने

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा