Advertisement

अजिंक्य रहाणेच्या स्पोर्ट्स अकादमीसाठी वांद्रेतील भूखंड भाड्याने

जमिनीवर अत्याधुनिक क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी सरकारने 30 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्टी मंजूर केली.

अजिंक्य रहाणेच्या स्पोर्ट्स अकादमीसाठी वांद्रेतील भूखंड भाड्याने
SHARES

क्रिकेटपटू (cricketer) अजिंक्य रहाणेला (ajinkya rahane) मुंबईतील (mumbai) वांद्रे (bandra) इथे 2,000 चौरस मीटरचा भूखंड भाड्याने देण्यास महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. जमिनीवर अत्याधुनिक क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी सरकारने 30 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्टी मंजूर केली.

ही जमीन मूळतः दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना 1988 मध्ये देण्यात आली होती. सरकारने त्यांना इनडोअर स्पोर्ट अकादमी (sports academy) बांधण्यासाठी जागा दिली होती. मात्र, 30 वर्षांपासून कोणतीही अकादमी बांधली गेली नाही. मे 2022 मध्ये, अखेर सरकारने जमिनीचा ताबा घेतला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागेचा वापर न झाल्यामुळे जागा पडीक झाली होती. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांनीही संबंधित कामांसाठी जागा अनधिकृत रित्या वापरण्यास सुरुवात केली होत. आता, महाराष्ट्र (maharashtra) गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला भाडेपट्टा तत्त्वावर जमिन देण्याचा ठराव मंजूर केला आहे. मंत्रिमंडळानेही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

FPJ च्या अहवालात, माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 2021 मध्ये गावस्करांच्या जमिनीचा वापर न केल्याबद्दल बोलले. आव्हाड म्हणाले की त्यांनी आधी ती रद्द करण्याचा विचार केला. परंतु गावस्करच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल आदर म्हणून कठोर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला गेला होता.

ही जमीन सुनील गावस्कर क्रिकेट (cricket) फाउंडेशन ट्रस्टच्या व्यवस्थापनाखाली होती. नंतर गावस्कर यांनी स्वत: ही जमीन मे 2022 मध्ये सरकारला परत केली.



हेही वाचा

कांदिवली : प्लॅटफॉर्म 4 वरील फूट ओव्हर ब्रिज तोडण्याची शक्यता

पंचकलशी पाककलेवर आधारित 'सोल फूड' पुस्तकाचे अनावरण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा