कांदिवली (kandivali) स्थानकामध्ये महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP-IIIA) अंतर्गत सध्या सुरू असलेल्या स्थानकांच्या नुतनीकरणाच्या उपक्रमांचा हा एक भाग आहे. पश्चिम रेल्वेने (western railway) प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील फूट ओव्हरब्रिजच्या (fob) दक्षिण टोकावरील ब्रिज तोडण्याची घोषणा केली आहे.
नवीन स्कायवॉकचे बांधकाम सुरू करण्यासाठी हा निर्णय 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होईल.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) या कामाचे नेतृत्व करत आहे, ज्यामुळे प्रवाशांना सोयीस्कर ठरेल आणि स्थानकावरील एकूण सुरक्षितता सुधारेल अशी अपेक्षा आहे. मात्र, जिना तो़डण्याचे काम सुरू केल्यामुळे प्रवाशांची तात्पुरती गैरसोय होऊ शकते.
"यामुळे होणाऱ्या कोणत्याही व्यत्ययाबद्दल पश्चिम रेल्वे मनापासून प्रवाशांची माफी मागते आणि प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे त्यानुसार नियोजन करण्याचे आवाहन करते. तसेच प्रवाशांचा दैनंदिन प्रवासावर कमीत कमी प्रभाव पडावा यासाठी पर्यायी मार्गांची माहिती दिली जाईल." असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा