Advertisement

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रेट्रो जर्सीत खेळणार टीम इंडिया


ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रेट्रो जर्सीत खेळणार टीम इंडिया
SHARES

आयपीएलनंतर आता क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्याची चर्चा रंगत आहे. येत्या २७ नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे टीम इंडिया जुन्या जर्सीत म्हणजेच रेट्रो जर्सीमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानं ही जर्सी घातल्याचा फोटो धुमाकूळ घालतो आहे. ७० ते ८० च्या दशकात टीम इंडियाची गाजलेली रेट्रो जर्सी चाहत्यांना पुन्हा मैदानात पहायला मिळणार असल्यानं सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

टीम इंडिया बुधवारी युएईतूनच थेट ऑस्ट्रेलियात रवाना झाली. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडिया या दौऱ्यात वन डे आणि टी २० मालिका रेट्रो जर्सीमध्ये खेळणार आहे. या नव्या जर्सीवर टीम इंडियाचा नवीन किट स्पॉन्सर MPL (Mobile Premier League) चा लोगो आहे. काही दिवसांपूर्वीच BCCI नं टीम इंडियाच्या किट स्पॉन्सरचं हक्क MPL ला दिलं आहेत.


टीम इंडिया कसोटी संघ :- 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ :- 

टीम पेन (कर्णधार व यष्टीरक्षक), सिन अबॉट, जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरुन ग्रिन, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लॉयन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्सकी, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन, मॅथ्य वेड, डेव्हिड वॉर्नर

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

  • पहिली कसोटी – १७ ते २१ डिसेंबर – अ‍ॅडलेड (दिवस-रात्र)
  • दुसरी कसोटी – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
  • तिसरी कसोटी – ७ ते ११ जानेवारी २०२१ – सिडनी
  • चौथी कसोटी – १५ ते १९ जानेवारी – गॅबा
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा