Advertisement

ट्रम्प नाइट्सचा अार्क्स मुंबईवर सहज विजय


ट्रम्प नाइट्सचा अार्क्स मुंबईवर सहज विजय
SHARES

वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० मुंबई लीगमध्ये मुंबई नाॅर्थ ईस्ट ट्रम्प नाइट्स संघाने अापल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. तिसऱ्या सामन्यात अार्क्स मुंबई संघाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवत ट्रम्प नाइट्स संघाने विजय साकारला. विनायक भोईर, कल्पेश सावंत यांच्या गोलंदाजीसमोर अार्क्स मुंबई संघाचा डाव १९.१ षटकांत ११६ धावांवर गडगडला. त्यानंतर शशांक सिंगच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे ट्रम्प नाइट्स संघाने हे अाव्हान लिलया पार केले.


सुब्रह्मण्यमची पुन्हा चमक

तन्मय मिश्रा अाणि डी. सुब्रह्मण्यम यांनी अार्क्स मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. मात्र विनायक भोईर अाणि कल्पेश सावंत यांनी त्यांना लागोपाठ धक्के दिले. त्यामुळे २ बाद ७२ वरून त्यांचा डाव ७ बाद ८८ असा गडगडला. डी. सुब्रह्मण्यम याने पुन्हा एकदा अापली चमक दाखवत ८ चौकारांसह ४९ धावांची खेळी केली. मात्र अार्क्स मुंबईच्या एकाही फलंदाजाची त्याला साथ लाभली नाही. विनायकने तीन तर कल्पेशने दोन विकेट्स मिळवत अार्क्स मुंबईच्या फलंदाजांवर अंकुश लावला. 



शशांक सिंगचे अर्धशतक

अार्क्स मुंबईचे ११७ धावांचे उद्दिष्ट गाठताना सुमीत घाडीगावकर अाणि शशांक सिंग यांनी ट्रम्प नाइट्ससाठी अर्धशतकी भागीदारी रचत विजयाचा पाया रचला. २० चेंडूंत ३ चौकार अाणि २ षटकारांसह ३२ धावा काढून सुमीत पॅव्हेलियनमध्ये परतला तरी शशांकने अापल्या संघाला विजयापर्यंत अाणून ठेवले होते. शशांकने अापल्या ५० चेंडूंच्या खेळीत ५ चौकार अाणि २ षटकारांसह ६३ धावा फटकावल्या. त्यामुळे ट्रम्प नाइट्सने २७ चेंडू अाणि सात विकेट्स शिल्लक राखून विजय मिळवला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा