विराट ठरला अव्वल क्रिकेटर, विस्डेनचा सन्मान

 Mumbai
विराट ठरला अव्वल क्रिकेटर, विस्डेनचा सन्मान

भारतीय क्रिकेटमधील हिरो समजल्या जाणाऱ्या विराट कोहलीचा फोटो क्रिकटमधील सर्वोच्च असा खिताब समजल्या जाणाऱ्या विस्डेन या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर लागला आहे.विस्डेन क्रिकेटर्स अलमॅनक मॅगझिनने विराटला 2016 मधील जगातील उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून जाहीर केलंय. कोहलीने याच वर्षात सलग चार कसोटी सामन्यांत चार द्विशतके लगावली आहेत. त्याची गेल्या वर्षभरातील कामगीरी हीदेखील भारतीय संघासाठी तसेच त्याच्या कारकिर्दीसाठी मोलाची ठरली आहे.

भारतीय संघाने विराटच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश तसेच इंग्लंड, वेस्ट इंडिज विरोधातील कसोटी मालिका जिंकली आहे. कोहलीने यंदाच्या हंगामात 1 हजार 200 धावा केल्या आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत त्याने फक्त 46 धावा केल्या. खांद्याच्या दुखापातीमुळे त्याला कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली.

जागतिक स्तरावर पुरुषांमध्ये क्रिकेटपटू विराट कोहली हा अव्वल राहिलाय, तर महिलांमध्ये ऑस्ट्रेलियाची एल्स पेरी ही महिला क्रिकेटपटू अव्वल आहे.

Loading Comments