Advertisement

विराटची रनमशीन सुस्साट! कसोटीत २० वं शतक, मुरली विजयचीही सेंच्युरी


विराटची रनमशीन सुस्साट! कसोटीत २० वं शतक, मुरली विजयचीही सेंच्युरी
SHARES

विराट कोहलीची धावांची टांकसाळ सुरूच असून त्यानं अाज कसोटीतील ५००० धावांचं शिखर सर केलं. श्रीलंकेविरुद्ध नवी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अाज विराट कोहलीनं कसोटीतील २०व्या शतकाची नोंद केली. या मालिकेत विराटनं सलग चौथं शतक झळकावण्याचा पराक्रम केला.मुरली विजयची सलग तिसऱ्या शतकाला गवसणी

श्रीलंकन गोलंदाजांसाठी विराट कोहली कर्दनकाळ ठरलेला असताना मुरली विजयही पाहुण्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलाय. बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या मुरली विजयनं दमदार पुनरागमन करत सलग तिसरं शतक झळकावलं. त्यानं अाज २६७ चेंडूंत १५५ धावांची खेळी साकारली.पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व

कोहली अाणि मुरली विजयच्या दमदार शतकी खेळीमुळं भारतानं अाज श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यावर वर्चस्व गाजवलं. भारतानं पहिल्या दिवसअखेर ९० षटकांत ४ बाद ३७१ धावा केल्या. विराट १६ चौकारांसह १५६ धावांवर खेळत असून विजयनं १५५ धावा फटकावल्या. शिखर धवन अाणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी २३ धावा काढून बाद झाले. मुंबईकर अजिंक्य रहाणे (१) पुन्हा एकदा फ्लाॅप ठरला.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा