Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

विराट, रोहित, बुमराहला मिळतं 'इतकं' मानधन, बीसीसीआयची वार्षिक करार यादी जाहीर

बीसीसीआयने विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहला ग्रेड ए प्लस कॅटेगरीत स्थान दिलं आहे.

विराट, रोहित, बुमराहला मिळतं 'इतकं' मानधन, बीसीसीआयची वार्षिक करार यादी जाहीर
SHARES

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंसोबतचा वार्षिक करार जारी केला आहे. ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी हा करार आहे.  कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा व  वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू ठरले आहेत.

बीसीसीआयने विराट कोहली,  रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहला ग्रेड ए प्लस कॅटेगरीत स्थान दिलं आहे.  विराट, रोहित, बुमराहला वर्षाला ७ कोटी रुपये मिळणार आहेत. बीसीसीआयने १० खेळाडूंना ग्रेड ए कॅटेगरीत स्थान दिले आहे. यामध्ये हार्दिक पांड्या, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. या सर्वांना वर्षाला पाच कोटी रुपये मिळतील.

वार्षिक करार यादी 

ग्रेड ए प्लस (७ कोटी रुपये)

विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह.

रेड ए (५ कोटी)

आर अश्विन, रवींद्र जाडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या.

ग्रेड बी (३ कोटी) 

वृद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि मयंक अग्रवाल.

ग्रेड सी (१ कोटी)

 कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज.Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा