Advertisement

हार्दिक पंड्याने मागितली इशान किशनची माफी


हार्दिक पंड्याने मागितली इशान किशनची माफी
SHARES

वानखेडे स्टेडियमवर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिक पंड्याच्या थ्रोमुळे मुंबई इंडियन्सचा सहकारी इशान किशनच्या डोळ्याला दुखापत झाली होती. यष्टीरक्षक इशानचा डोळा सुजल्यामुळे त्याला तातडीने हाॅस्पीटलमध्ये नेण्यात अाले होते. या प्रकाराच्या दोन दिवसानंतर हार्दिक पंड्याने ट्विटरवर फोटो पोस्ट करत इशान किशनची माफी मागितली अाहे.


काय घडले?

१३ व्या षटकांत हार्दिकने फेकलेला चेंडू बाजूच्या प्रॅक्टिस ग्राउंडवर अादळून थेट इशानच्या चेहऱ्यावर लागला. चेहऱ्याचा एक भाग सुजल्यानंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात अाले होते. त्याची जागा अादित्य तरेने घेतली होती.


काय म्हणाला पंड्या...

'मेरा क्यूट पाय. साॅरी भाई. असाच स्ट्राँग रहा,' अशा शब्दांत पंड्याने किशनची माफी मागितली अाहे. इशान किशनला मुंबई इंडियन्सने ६.२ कोटी रुपयांना विकत घेतले अाहे. किशनने अायपीएलमधील २२ सामन्यांत ४१२ धावा फटकावल्या असून त्याच्या नावावर एका अर्धशतकाचीही नोंद अाहे.


हेही वाचा -

मुंबई इंडियन्सची विजयाची बोहनी, वानखेडेवर बंगळुरूला धूळ चारली

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा