Advertisement

मुंबई इंडियन्सला धक्का, पॅट कमिन्सची माघार


मुंबई इंडियन्सला धक्का, पॅट कमिन्सची माघार
SHARES

पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला घरच्याच मैदानावर चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाचा धक्का पचवावा लागल्यानंतर अाता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला दुसरा मोठा धक्का बसला अाहे. अाॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यानं पाठीच्या दुखण्यामुळं अायपीएलमधून माघार घेतल्यानं अाता मुंबई इंडियन्सच्या चिंतेत मोठी भर पडली अाहे. मुंबई इंडियन्सने अायपीएलच्या लिलावात ५.४० कोटी रुपये मोजून पॅट कमिन्सला विकत घेतलं होतं.


अतिक्रिकेटचा फटका

गेल्या वर्षभरात अतिक्रिकेट खेळल्यामुळेच पॅट कमिन्सला दुखापतीला सामोरं जावं लागलं अाहे. वर्षभरात १३ कसोटी सामन्यांत कमिन्सनं अाॅस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. इतकंच नव्हे तर त्यानं या मोसमात चक्क ४४७.५ षटकं टाकली अाहेत. अाॅस्ट्रेलिया अाणि दक्षिण अाफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेमुळे मिचेल स्टार्क, कॅगिसो रबाडा, फॅफ डू प्लेसिस अाणि अाता पॅट कमिन्स यांना दुखापतीचा फटका बसला अाहे.


कमिन्सला गेल्या अाठवड्यापासूनच दुखापतीचा त्रास जाणवू लागला होता. जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेतही तो खेळू शकणार नाही. दुखापतीतून पूर्णपणे बरा होण्यासाठी अाम्ही त्याला अायपीएलमध्ये खेळू न देण्याचा सल्ला दिला होता.
- डेव्हिड बेकले, अाॅस्ट्रेलियाचे फिजियोथेरपिस्ट

हेही वाचा - 

केदार जाधवची अायपीएलमधून माघार

मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, बेहरेनडाॅर्फच्या जागी मिचेल मॅकक्लेनाघन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा