Advertisement

मुंबईकर वासिम जाफर विदर्भसाठी मोफत रणजी खेळतो तेव्हा...


मुंबईकर वासिम जाफर विदर्भसाठी मोफत रणजी खेळतो तेव्हा...
SHARES

वासिम जाफर हा एकेकाळचा मुंबई रणजी संघाचा अाणि भारतीय संघाचा भरवशाचा अाधारस्तंभ. तब्बल दीड दशकांपेक्षा जास्त मुंबई क्रिकेटची सेवा केल्यानंतर वासिम जाफरने राष्ट्रीय क्रिकेटमधील दुबळ्या समजल्या जाणाऱ्या विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला. या वर्षी विदर्भ संघानं एेतिहासिक कामगिरी करत पहिल्यावहिल्या रणजी जेतेपदाला गवसणी घातली. विदर्भच्या या रणजी विजेतेपदात वासिम जाफर अाणि प्रशिक्षक चंद्रकांत पंडित या दोन मुंबईकरांचा मोलाचा वाटा होता. मात्र विदर्भला रणजी करंडक जिंकून देणाऱ्या वासिम जाफरनं एक रुपयाचंही मानधन घेतलं नाही, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण खुद्द जाफरनंच या गोष्टीचा खुलासा केला अाहे.



म्हणूनच मानधन न घेण्याचा निर्णय घेतला

२०१६-१७ मध्ये गेल्या मोसमात विदर्भने माझ्याशी करार केला होता. त्यांनी मला अाॅक्टोबर, जानेवारी अाणि मार्च अशा तीन टप्प्यात मानधन दिले होते. रणजी स्पर्धेत मी मोलाची भूमिका बजावावी, असे त्यांना वाटत होते. पण या वर्षी अाॅक्टोबर महिन्यात दुखापतीमुळे मला महत्त्वपूर्ण कामगिरी निभावता अाली नाही. जानेवारीत मी फिट झालो, तरीही त्यांनी माझ्या कराराचा अादर राखत मला पूर्ण मोसमाचे मानधन देऊ केले. ते अयोग्य होते. त्यामुळेच या मोसमात मी एकही पैसा न घेण्याचा निर्णय घेतला, तोच अामच्यासाठी फायदेशीर ठरला, असं वासिम जाफरनं सांगितलं.


का केली विदर्भची निवड?

अनेक वर्षे मुंबई क्रिकेटची सेवा केल्यानंतर मला असा संघ हवा होता की, ज्या ठिकाणी मी खेळू शकतो, क्रिकेटसाठी योगदान देऊ शकतो अाणि युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करू शकतो. विदर्भने २००९ मध्ये निवासी अकादमी स्थापन केली होती. अापल्या क्रिकेटमध्ये सुधारणा व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच मी छोट्या का होईना, पण माझ्यासाठी योग्य असलेल्या विदर्भची निवड केली, असंही जाफरनं सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा