Advertisement

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 'या' मैदानावर

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) अंतिम सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर पार पडणार होता.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 'या' मैदानावर
SHARES

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) अंतिम सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर पार पडणार होता. परंतु, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) हा सामना इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आता साऊथहॅम्पटनच्या एजीएस बोल स्टेडियममध्ये होणार असल्याची घोषणा आयसीसीने बुधवारी केले. तसंच एजीएस बोल हे घरचे मैदानावर असणाऱ्या हॅम्पशायर कौंटी क्लबनेही ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली.

अंतिम सामना साऊथहॅम्पटन येथे १८ ते २२ जून या कालावधीत पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने अंतिम सामना साऊथहॅम्पटन इथं होऊ शकेल असे संकेत दिले होते. आयसीसीनं बुधवारी यावर शिक्कामोर्तब केलं. ‘भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना साऊथहॅम्पटनच्या हॅम्पशायर बोल येथे जैव-सुरक्षित वातावरणात पार पडेल.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाशी बरीच चर्चा करून आयसीसी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे,’ असे आयसीसीने त्यांच्या पत्रकात म्हटलं. साऊथहॅम्पटनच्या स्टेडियममध्येच पंचतारांकित हॉटेल असल्यानं खेळाडू आणि पंच यांना जैव-सुरक्षित वातावरणात राहताना अडचण येणार नाही असं आयसीसी तसंच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला वाटते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा