27 वर्षानंतर वाजला संचार बंदीचा 'सायरन्स'


27 वर्षानंतर वाजला संचार बंदीचा 'सायरन्स'
SHARES

युद्ध जन्य परिस्थीती निर्माण झाल्यावर नागरीकांना सतर्क करण्यासाठी वाजणारे सायरन एकाद्या रोगाविरोधातील युद्धातही वाजवले जातील, याचा विचारही कोणी केला नसेल. पण मुंबईत गेल्या अनेक वर्षांनंतर एमर्जन्सी सायरन वाजवून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आल्याची रविवारची पहिलीच घटना आहे. होमगार्ड व नागरी संरक्षण संचालयनालयाचे महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी हा नागरी संरक्षण संचालनालयाच्या फोर्ट येथील कार्यालयात हा सायरन वाजवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशाला संबोधित करताना जनतेला 'जनता कर्फ्यु'साठी आवाहन केले होते. नागरिकांना गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, असं सांगतानाच 'आवश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडावंच लागेल' याचीही जाणीव पंतप्रधान मोदींनी करून दिली. पण अशाच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी मोदींनी एक अनोखं आवाहनही मोदी यांनी केले होते. त्यांच्या आवाहनानुसार मुंबईकरांनी टाळ्या, घंटा, थाळ्या, शंख वाजवून  डॉक्टर, नर्स, रुग्णालयाचे कर्मचारी, एअरलाईन्सचे कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी, मीडिया कर्मचारी, रेल्वे, बस, ऑटो सुविधा पुरवणारे, डोम डिलिव्हरी यांच्या बाबत कृतज्ञता व्यक्त केली. पण याच वेळेला फोर्ट येथील होम गार्ड व नागरी संरक्षण विभागातूनही एमरजन्सी सायरन वाजवून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात आला.महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी हा सायरन वाजवला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत मुंबईत अशा प्रकारे सायरन वाजवण्यात आला.

मुंबईत 1993 मध्ये आलेल्या जातीय दंगलींच्या काळात संचारबंदीचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी हा सायरन वाजवण्यात आला होता. त्यानंतर आता हा सायरन वाजवण्यात आला. याबाबत बुरडे यांच्याशी संपर्क साधला असता यापूर्वी नेमका कधी सायरन वाजवण्यात आला होता.ते निश्चित सांगता येणार नाही. पण मी दोन वर्षांपासून नागरी संरक्षण विभागात कार्यरत आहे.तेव्हापासून प्रथमच अशा प्रकारे सायरन वाजण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर नागरी संचालयालयाला वरिष्ठ पातळीवरून सायरन बाजवण्याबाबतचे आदेश आले होते. त्यानुसार हा सायरन वाजवण्यात आला. 1962 मध्ये चीनच्या युद्धानंतर नागरीकांच्या संरक्षणासाठी नागरी संरक्षण संचालनालयाची निर्मीती करण्यात आली होती. युद्धजन्स अथवा आणीबाणीच्या परिस्थीतीत नागरीकांना सूचीत करण्यासाठी, सावध करण्यासाठी या विभागातर्फे सायरन वाजवले जातात. राज्याच्या पाच जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने सायरन वाजण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यात मुंबई, ठाणे,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण संचालयालयाचे कार्यालय आहे.

नागरी संरक्षण मुख्यालय सेवेमार्फत विविध नागरी संरक्षण उपाययोजनाचा आराखडा तयार करणे, त्याच्या अंमलबजावणीचे आदेश निर्गमित करणे व त्यानुसार कामकाज वर नियंत्रण ठेवणे ही कामे पाहिली जातात. संचालक हे नागरी संरक्षण हे संघटनेचे नियंत्रक म्हणून काम पाहतात. मुंबईसारख्या मोठ्या आणि अतिमहत्त्वाच्या शहरात अतिरिक्त नियंत्रक, नागरी संरक्षण हे त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रातील उपनियंकाकडून त्याच्या योजनाची अमंलबजावणी करून घेतात. तसेच इतर शहरात नागरी संरक्षण हे उपनियंत्रक, नागरी संरक्षण व त्यांचे कर्मचारी यांचेकदून केले जाते. या सर्व कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या महाराष्ट्र शासनाकडून केल्या जातात.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा