रक्तचंदन तस्करांचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला पर्दाफाश

प्लास्टिकमध्ये २६ रक्तचंदनाचे ओडके लपवण्यात आले होते. हे रक्तचंदन चैन्नई येथील जंगलातून आणण्यात आले होते.

रक्तचंदन तस्करांचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला पर्दाफाश
SHARES

मुंबईत  मागील अनेक दिवसांपासून बाहेरील तस्करांनी कोट्यावधी रुपयांच्या रक्तचंदनाची तस्करी सुरू केली आहे. अशाच एका टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखा ७ च्या पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी अफसर रहिम फूलवाले (३५), भाऊसाहेब गोविंद भोसले (३४) अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी या दोघांजवळून १ कोटी ३४ लाखाचे रक्तचंदन हस्तगत केले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली.


पश्चिम उपनगरासह मुंबईच्या पूर्व उपनगरात रक्तचंदनाची तस्करी करण्यासाठी हे दोघे रक्तचंदनाच्या ओडक्यांनी भरलेला ट्रक घेऊन आले. याबाबतची माहिती गुन्हे शाखा ७ च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी हा संशयित ट्रक अडवून तपासला असता. त्यात प्लास्टिकमध्ये २६ रक्तचंदनाचे ओडके लपवण्यात आले होते. हे रक्तचंदन चैन्नई येथील जंगलातून आणण्यात आले होते. त्यानुसार याप्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोनही आरोपींना अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या रक्त चंदनाची किंमत एक कोटी ३४ लाख रुपये आहे. आरोपी हे रक्त चंदन परदेशात पाठवणार होते. त्या आधीच त्यांना अटक करून गुन्हे शाखेच्या कक्ष-७ च्या पोलिसांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा