बदनामीचा सूड घेण्यासाठी प्रेयसीच्या लहान बहिणीचे अश्लील फोटो केले वायरल

प्रियसीच्या बहिणीने केलेल्या या अपमानामुळे दिनेश चांगलाच संतापलेला होता. या कृत्याचा सूड घेण्यासाठी आणि प्रेयसिच्या बहिणीला चांगलीच अद्दल घडवण्याचे दिनेशने ठरवले. त्याला पीडित तरुणीची बदनामी करायची असल्यामुळे तिचे नग्न छायाचित्र घेण्याचे ठरवले.

SHARE
नवराञौत्सवात प्रेयसीच्या लहान बहिणीने सर्वांसमोर बदनामी केली. त्याचा सूड घेण्याच्या उद्देशाने प्रियकराने प्रियसीच्या मदतीने  लहान बहिणीचे अश्लील फोटो वायरल केल्याची धक्कादायक  घटना आग्रीपाडा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीला अटक केली असून तिच्या प्रियकराचा पोलिस शोध घेत आहे. 

भायखळा परिसरात राहणारी पीडित तरुणी एका खासगी कंपनीत कामाला आहे.  पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीचे त्याच परिसरात राहणाऱ्या दिनेश मरय्यासोबत प्रेमसंबध होते. माञ पीडित मुलीच्या घरच्यांचा त्याला विरोध होता. कारण दिनेशचा यापूर्वीच विवाह झाला असून त्याला तीन मुले आहेत. माञ तरी ही पीडितेच्या मोठ्या बहिणीने त्याच्याशी संबध ठेवले होते. ही बाब फक्त पीडित तरुणीलाच माहित होती. नवराञौत्सवात दिनेशची पत्नी पुजासोबत पीडितेचे भांडण झाले होते.  त्या भांडणात दिनेशही मध्ये पडला. त्यावेळी पीडित तरुणीने दिनेशला सर्वांसमोर चांगलाच चोप दिला.
 

सर्वांसमोर प्रियसीच्या बहिणीने केलेल्या या अपमानामुळे दिनेश चांगलाच संतापलेला होता. या कृत्याचा सूड घेण्यासाठी आणि प्रेयसिच्या बहिणीला चांगलीच अद्दल घडवण्याचे दिनेशने ठरवले. त्याला पीडित तरुणीची बदनामी करायची असल्यामुळे तिचे नग्न छायाचित्र घेण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने 28 ऑक्‍टोबरला प्रेयसीला म्हणजेच पीडित तरुणीच्या बहिणीला व्हिडिओ कॉल केला व बहिणीचे नग्न छायाचित्र घेण्यासाठी मदत करण्यास सांगितले. तसे न केल्यात तुझ्यासोबत लग्न करणार नाही, असेही धमकावले. दिनेश सोडून जाईल या भितीने मोठ्या बहिणीने लहान बहिण अंगोळ करत असताना. दिनेशला व्हिडिओ काँल केला. त्यानंतर तिने फोन त बहिण आंघोळ करत असलेल्या मोरीजवळ नेला.

त्या चिञीकरणाच्या व्हिडिओचा  दिनेशने स्क्रीनशॉर्ट घेतला व तो पीडित तरुणीच्या सासऱ्याला पाठवला. त्याने याबाबत विचारले असता पीडित महिलेच्या लक्षात सर्व प्रकार आला. तिने तात्काळ बहिणीला भेटून याबद्दल विचारणा केली असता. तिने दिनेशला मदत केल्याचे मान्य केले. तसेच त्याने मदत न केल्यास लग्न न करण्याची धमकी दिल्यामुळे हा प्रकार केल्याचे सांगितले. या प्रकरणी पीडित तरुणीने आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या मोठ्या बहिणीला अटक केली आहे. तर पोलिस या प्रकरणातील मुख्य आरोपी दिनेशचा शोध घेत आहेत.
संबंधित विषय
ताज्या बातम्या