आयपीएल बेटिंग प्रकरणी 10 अटकेत

 Grant Road
आयपीएल बेटिंग प्रकरणी 10 अटकेत
Grant Road, Mumbai  -  

आयपीएल सुरू होऊन अवघे काही दिवस होतात न होतात तोच आता आयपीएलवरील बेटिंगला उधाण आले आहे. मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातून पोलिसांनी रविवारी रात्री सट्टेबाजी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला असून 10 जणांना अटक केली आहे.

ग्रँट रोड येथील लाडाचा गणपती मंदिराच्या मागे असलेल्या एका खोलीत सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रविवारी संध्याकाळी मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्सचा सामना सुरू असताना झोन 2 च्या स्कॉडने या खोलीवर छापा टाकत 10 जणांना रंगेहाथ पकडले. या सगळ्यांना पोलिसांनी जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक केली असून यांच्याकडून 12 मोबाइल, टीव्ही अशी तब्बल 4 लाखांची मलमत्ता जप्त केली आहे.

Loading Comments