चोरीमुळे अत्याचाराचा प्रकार उघडकीस

 Andheri
चोरीमुळे अत्याचाराचा प्रकार उघडकीस

अंधेरी - अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना अंधेरीत घडली आहे. यातले 10 आरोपी अल्पवयीन असून ते पीडित मुलाच्या आसपासच्या परिसरातले राहणारे आहेत. पोलिसांनी याप्रकरणी सर्व आरोपींना अटक केली आहे.

एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार 6 महिन्यांपूर्वी ईदच्यानंतर एका 12 वर्षांच्या मुलाला त्याच्याच परिसरात राहणाऱ्या आरोपींमधील तीन मुलांनी मदरश्याच्या गच्चीवर नेले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तीन मुलांच्या जागी 10 मुलांनी त्याच्यासोबत सतत अत्याचार करत राहिले. याच दरम्यान या मुलांनी त्याचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि त्या मुलाकडे पैशाची मागणी करू लागले. त्यानंतर पीडित मुलाने स्वत:च्या घरात चोरी करून आरोपींना पैसे देत राहिला. अशा प्रकारे त्याने 25 हजार रुपये आरोपींना दिले. पण जेव्हा त्यामधील एका आरोपीच्या आईने पैसे कुठून आणल्याचे विचारल्यानंतर त्या मुलाने पीडित मुलाचं नाव सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सर्व आरोपींची डोंगरीच्या सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी 12 ते 16 वयोगटातील आहेत.

Loading Comments