परदेशी नागरिक असलेल्या 10 तबलिगींना मुंबईत अटक


परदेशी नागरिक असलेल्या 10 तबलिगींना मुंबईत अटक
SHARES

कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून टाकले आहे. त्यातच दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरातील मरकज येथे गेल्या काही दिवसांपूर्वी तबलिगी जमातचा कार्यक्रमामुळे या संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याची टिका सर्वच स्तरावरून होऊ लागली. त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदान पोलिस ठाण्यात तबलिगींवर गुन्हा नोंदवला होता. त्यातील 10 परदेशी तबलिगींना पोलिसांना काल अटक केली.

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तबलीगी जमात मरकजला  सहभागी झालेल्या 150 व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ त्यांचा शोध घेऊन त्यातील अनेकांना वेगळे करण्यात आले. पण देशात व राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सामुहिक कार्यक्रम करण्यास मनाई असतानाही मुंबईतील 150 व्यक्ती या तबलिगीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसेच त्याची माहिती लपवल्याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी या 150 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासात काही परदेशी तबलिगी ही सहभागी झाले असल्याचे निश्पन्न झाल्यानंतर त्यांच्याजवळ चौकशी केली. त्या चौकशीत ते टूरिस्ट व्हिजावर भारतात येत या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर ही कारवाई केली. त्यातील 10 जणांना काल अटक केली. अटक केलेले तबलिगी जमातचे हे सगळे सदस्य इंडोनेशियाचे आहेत. 


टूरिस्ट व्हिजाच्या नावाखाली दिल्लीत जमलेल्या तबलिगी समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणाऱ्या नागरिकांकडून व्हिसा उलंघन केल्या प्रकरणी 15 गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 1,82,76,744 (1 कोटी 82 लाख 76 हजार 744) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा