वीज चोर अटकेत

 Shivaji Nagar
वीज चोर अटकेत

शिवाजीनगर - रिलायन्स कंपनीची वीज चोरी करून ही वीज इतर रहिवाशांना विकणाऱ्या 13 जणांना शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. रिलायन्स अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून सहाय्यक निरीक्षक सागर आव्हाड यांच्या पथकाने कमला रामननगर परिसरात ही कारवाई केली. यामध्ये चोरीची वीज विकणारे वीजमाफीया आण चोरीची वीज वापरणारे ग्राहक अशा एकूण तेरा आरोपींना पोलिसांनी अटक केली. दहा आरोपी सध्या फरार आहेत. शिवाजीनगर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या वीजचोरीमुळे रिलायंस एनर्जीला वीजवितरक कंपनीला अंदाजे पाच लाख रुपये तोटा झाल्याचं तक्रारीत म्हटले आहे. आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Loading Comments