अंधेरीत बस-डंपरचा अपघात, १५ प्रवासी जखमी


अंधेरीत बस-डंपरचा अपघात, १५ प्रवासी जखमी
SHARES

अंधेरीच्या मरोळ परिसरात बेस्ट बस आणि डंपरच्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातातील जखमी प्रवाशांना उपचारासाठी जोगेश्वरीच्या ट्रामा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


कसा झाला अपघात?

मरोळ डेपोची ५४५ क्रमांकाची बेस्ट बस एरोलीहून अंधेरीच्या आगरकर चौकाच्या दिशेने जात होती. त्यावेळी साठे चौकातील एका वळणावर डंपर उभा होता. त्यावेळी बेस्ट चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बेस्टने डंपरला धडक दिल्याचे एमआयडीसी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या अपघातात १५ जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जोगेश्वरीच्या ट्रामा केअर रुग्णालयात हलवण्यात आले. सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं असून डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या अपघाताची वस्तूस्थिती पडताळून दोषी चालकावर गुन्हा नोंदवणार असल्याचं एमआयडीसी पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा