धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

त्याने तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केले. ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने या घटनेची माहिती कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे.

धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर  अत्याचार
SHARES

उत्तर प्रदेशातील बलरामपूर आणि हाथसरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला असताना. मुंबईच्या मालवणी परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.

हेही वाचाः- मुख्यमंत्री बदलला की जागेची मालकी बदलते का?, महापौरांचा सवाल

मालाडच्या मालवणी परिसरात राहणाऱ्या आरोपी आणि पीडित मुलगी एकाच कुटुंबातील आहेत. मागील अनेक दिवसांपासून आरोपीची मुलीवर वाईट नजर होती. त्यातूनच सोमवारी आरोपीने घरात कुणी नसल्याची संधी साधून मुलीला रिव्हाल्वर दाखवली. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केले. ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने या घटनेची माहिती कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. घरातील इतर सदस्य आल्यानंतर पीडितेने घडलेल्या घटनेची माहिती आईला दिली. तिने मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीडित तरुणी पोलिसात गेल्याचे कळताच आरोपीने पळ काढला. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी आरोपी विरोधात ३७६ (एफ), ५०६(२), भा.द.वि कमासह ४,५(द),६ पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असल्याची माहिती मालवणी पोलिसांना दिली. पोलिस सध्या फरार आरोपीच्या शोधात आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा