Advertisement

मुख्यमंत्री बदलला की जागेची मालकी बदलते का?, महापौरांचा सवाल

केंद्र सरकार या जागेवर आपला हक्क सांगत आहे. तेव्हा मुख्यमंत्री बदलला की जागेचा पॅटर्न बदलतो का असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री बदलला की जागेची मालकी बदलते का?, महापौरांचा सवाल
SHARES

फडणवीस सरकारच्या काळात मेट्रो कारशेड (metro car shed) उभारण्यासाठी आवश्यक कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारची आहे, असं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आलं होतं. पण केंद्र सरकार या जागेवर आपला हक्क सांगत आहे. तेव्हा मुख्यमंत्री बदलला की जागेचा पॅटर्न बदलतो का असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (mumbai mayor kishori pednekar) यांनी उपस्थित केला आहे.

कांजूरमार्गच्या वादग्रस्त जागेवर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी कांजूरमार्गची जागा राज्य सरकारची असल्याचं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं होतं. ही जागा राज्याची आहे, असं मुख्यमंत्री सांगत असताना मुख्यमंत्री बदलल्यानंतर लगेच जागेचा पॅटर्न बदलतो का? याप्रकरणी केंद्र सरकारची नक्की भूमिका काय आहे? कांजूरमार्गच्या जागेवर कारशेड उभं राहिल्यावर जी कनेक्टिव्हिटी तयार होईल, त्याचा मेट्रो प्रवाशांना फायदाच मिळणार आहे. हा लोकांच्या हिताचा प्रकल्प आहे. कारशेड आरेतून हटवल्याने पर्यावरणाचंही संवर्धन होणार आहे. त्यामुळे याबाबतची कागदपत्रे केंद्राकडे पाठवल्यावर पंतप्रधान देखील यावर योग्य तोच निर्णय घेतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी मत व्यक्त केलं.

हेही वाचा- कमळाचार्याचा तिरका डोळा जनतेनेच फोडावा- काँग्रेस

उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडची (metro car shed) जागा राज्य सरकारने एमएमआरडीएला (MMRDA) वर्ग केली ती जागा मिठागरांसाठी आहे आणि आता कारशेड बनवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने देण्यात आली, असं पत्रात म्हटलं आहे. त्यावरून भाजपकडून राज्य सरकारवर (maharashtra government) सातत्याने टीका सुरू आहे.

यावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले की, याआधी मिठागराच्या बर्‍याचशा जागा राज्य सरकारला केंद्राने २००२ साली वर्ग केल्या आहेत. भाजपचे लोक सुरुवातीला ही खाजगी जागा आहे सांगत होते आणि आता केंद्र सरकारच्या मालकीची आहे असे सांगत आहेत. यावरुन भाजपच्या लोकांना मेट्रोच्या कामात अडथळा आणायचा आहे. त्यासाठीच भाजपकडून कटकारस्थान सुरू आहे, असं दिसतंय, असं नवाब मलिक म्हणाले.

राज्य सरकारने आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवल्यामुळे पर्यावरण संवर्धनाचं काम झालं आहे. मेट्रो ३ आणि मेट्रो ६ हे दोन्ही मार्ग जोडले जाऊन २० लाख प्रवाशांना त्याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे या जागेसंदर्भातील सर्व कागदपत्रे ही राज्य सरकारकडून केंद्र सरकाच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागाला पाठवण्यात येतील, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं. (mumbai mayor kishori pednekar slams bjp devendra fadnavis over metro car shed and kanjurmarg land)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा