मुंबई विमानतळावर 18 किलोचं सोनं हस्तगत


मुंबई विमानतळावर 18 किलोचं सोनं हस्तगत
SHARES

मुंबई विमानतळावर सोने तस्करीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सीमाशुल्क विभागाने सोने तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम हाती घेत मागील काही महिन्यांत कोट्यावधी रुपयांची सोने तस्करी डीआरआय अधिकाऱ्यांनी उघडकीस आणली आहे. डी आरआयच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच 18.3 किलो सोन्यासह एकाला अटक केली आहे.


सुरक्षा तपासणी अधिक कडक

सोने तस्करीसह इतर काही हानीकारक वस्तूंची तस्करी होत असल्याचा संशयही सुरक्षा अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. परिणामी आता मुंबई विमानतळावरील सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्यात येणार आहे. सोन्याच्या तस्करीसाठी आंतरराष्ट्रीय तस्करांनी बहुधा मुंबईची निवड केली असावी.

IMG-20180805-WA0033.jpg

मागील अनेक कारवायांमध्ये तस्करांनी बोगस कंपन्या उभ्या करून त्या कंपन्यांकडे मशिनरींचा व्यवहार दाखवत असत. शिवाय या आयात करण्यात आलेल्या मशिनरीतील स्क्रू किंवा इतर नटबोल्ट हे सोने वितळवून बनवून त्यावर कलर देऊन मशिनमध्ये फिट केले जातात.

IMG-20180805-WA0032.jpg

18.3 किलोच्या सोन्याची तस्करी

हा आगळा वेगळा प्रकार पुढे आल्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी कारवाई अधिकच आवळली. नुकतीच मुंबई विमावतळावर हाँगकाँहून आलेल्या एका प्रवाशाला डी आरआयच्या अधिकाऱ्यांनी 18.3 किलोच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी अटक केली आहे. संगणकीय सामानातील हार्डडिक्सचे कव्हर आणि इतर प्लेट सोने वितळवून बनवून ती ओळखता येऊ नये, यासाठी चंदेरी रंग दिला होता.

IMG-20180805-WA0031.jpg
डी आरआयच्या अधिकाऱ्यांनी हस्तगत केलेल्या सोन्याची किंमत ही 5.4 कोटी इतकी आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनेनंतर मुंबई विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्यात येणार असल्याची माहिती एका डीआरआयच्या अधिकाऱ्याने दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा