पांडवपुत्र टोळीचे गुन्हेगार तडीपार

 Kumbharwada
पांडवपुत्र टोळीचे गुन्हेगार तडीपार

मुंबई - दक्षिण मुंबईतील गुन्हेगारीमधे दबदबा असलेल्या पांडवपुत्र टोळीच्या चार गुन्हेगारांना व्ही.पी.रोड पोलिसांनी तडीपार केलेे आहे. यामध्ये दीपक वालेकर (28), अनिल भुवड (30), किरण वांगडे उर्फ भाजीवाला (24) आणि राजू शेख (31) यांचा समावेश आहे.

हे चारही गुन्हेगार सराईत असून, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला असून या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता परिमडंळ दोनच्या पोलीस उपायुक्तांनी दोन दिवसांपूर्वी हे पाऊल उचललेे आहे. एवढेच नाही तर या परिसरातून 14 जणांना तडीपार करण्यात आले आहे. यादरम्यान हे संशयित या परिसरात आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading Comments