नज़र हटी तो दुर्घटना घटी, लोअर परळमध्ये अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

हा अपघात पाहत अनेक गाड्यापुढे जात होत्या. त्याच प्रमाणे दुचाकीहून निघालेल्या अनिकेत ही त्या अपघाताकडे बघत दुचाकी चालवत होता. त्याचवेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो एका बेस्ट बसच्या खाली आला.

नज़र हटी तो दुर्घटना घटी, लोअर परळमध्ये अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
SHARES

मुंबईच्या लोअरपरळच्या उड्डाणपूलावर दोन कारचा भीषण अपघात पाहण्याच्या नादात एका दुचाकी स्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तो बेस्ट बस खाली आला. अनिकेत रेवळे असे या तरुणाचे नाव असून त्याचा या अपघातात मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. एकाच ठिकाणी अवघ्या पाच मिनिटात या दोन्ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. या अपघातात अन्य दोन जण हे किरकोळ जखमी झालेले आहेत.  

हेही वाचाः- Amitabh Bachchan's Jalsa bungalow ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर रक्तपात

मुंबईच्या लोअरपरळ उड्डाणपूलावर रविवारी सायंकाळच्या सुमारास एक विचित्र अपघात घडला. या अपघातात एका कारने दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका गंभीर होता की, एका कारने दुसऱ्या कारला उड्डाणपूलाहून खाली ढकलनेचे बाकी राहिले होते. उड्डाणपुलाच्या सुरक्षाभिंतीवर दुसरी अपघातग्रस्त कार अतराळी अडकली होती. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. तर अपघात पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही वेळेसाठी त्या परिसरात वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती. कालांतराने पोलिसांनी वाहतूक पून्हा सुरळीत सुरू केली.

हेही वाचाः- अतिरेक्यांची ताज हॉटेलला धमकी, कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हा अपघात पाहत अनेक गाड्यापुढे जात होत्या. त्याच प्रमाणे दुचाकीहून निघालेल्या अनिकेत ही त्या अपघाताकडे बघत दुचाकी चालवत होता. त्याचवेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो एका बेस्ट बसच्या खाली आला. या अपघातात अनिकेत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने परळच्या के.ई.एम रुग्णालयात नेले असता. डाँक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. अनिकेत हा सांताक्रूझ परिसरात राहणारा असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या अपघातापासून अनिकेतचा अपघात झाला ते अंतर अवघ्या पाच मीटरच्या अंतरावर असल्याचे पोलिसांनी सांगितले. कार अपघातातील दोन्ही चालक किरकोळ जखमी झाले असून त्याचे जबाब पोलिस नोंदवत आहेत. तर दुसरीकडे अनिकेतच्या अपघाती मृत्यूची नोंद ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी केली असून बेस्ट बस चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा