मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणार्या मुंबई पोलिसांची मुंबईतच परवड होत असल्याचे दिसून येते. पोलिसांसाठी असलेल्या ३६७ पोलिस चौक्यांपैकी १८७ पोलिस चौक्या अधिकृत आहे. तर उर्वरित १८९ पोलिस चौक्या अनधिकृत आहेत. या चौक्या अधिकृत करण्यासाठी पालिकेला प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावातील केवळ संवेदनशील विभागातील चौक्या अधिकृत होतील असे पालिकेने म्हटलं आहे. त्यामुळे इतर चौक्या इतर अनधिकृतच ठरणार आहे. परिणामी या बेकायदा चौक्यांमध्येच पोलिसांना आपले कर्तव्य बजावाव लागणार आहे.
हेही वाचाः- महाराष्ट्र CID ची वेबसाईट दहशतवादी संघटनेकडून हॅक
असं म्हणतात, जगभरात स्कॉटलंड यार्ड पोलिसांनतर मुंबई पोलिसांचा दुसरा नंबर येतो. शौर्य, कौशल्य, लोकांची सेवा यामुळे मुंबई पोलिसांची जगात वेगळी ओळख आहे. मात्र त्याच मुंबई पोलिसांकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. १३ कोटी लोकसंख्या असलेल्या धावणाऱ्या, चमचमणाऱ्या मुंबईला सुरक्षित ठेवणं हे मोठं आव्हान आहे. हे आव्हान मुंबई पोलिस योग्यरित्या पेलतात. याच मुंबई पोलिसांनी शहरातील अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडलं. इथे बॉलिवूड, देशाचं उद्योगविश्व वसलं आहे. इतकंच नाही तर मुंबई पोलिस आयुक्तांचं पद राज्याच्या महासंचालकांपेक्षाही ताकदीचं असतं असं म्हटलं तरी चुकीचे ठरणार नाही. मात्र असे असताना ही सरकारकडून पोलिसांना आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जात नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
हेही वाचाः- रासायनिक रंग व वृक्षतोड करणाऱ्यांवर होणार कारवाई, होळी साजरी करणाऱ्यांनो सावधान!
देशभरात CAA आणि NRC विरोधात वातावरण तापलं असताना. मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भू शकतो. त्यामुळेच पोलिसांनी ९४ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ३६७ पोलिस चौक्यांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी शहरातील १८९ चौक्या या अनधिकृत असल्याने त्या ठिकाणी आवश्यक सेवा पुरवताना हात आकडा घ्यावा लागत आहे. अशातच या चौक्या अधिकृत करण्यात याव्या असा अर्ज पोलिसांनी पालिकेला दिला होता. मात्र पालिके पोलिसांना फक्त संवेदनशील ठिकाणच्या चौक्यात अधिकृत करण्यात येतील सर्व चौक्या अधिकृत करण्यात पालिकेचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी नकार दिला आहे. मात्र पोलिसांच्या नुसत्या चौक्याच नाही.
हेही वाचाः- कोस्टल रोडने घेतले दोन पोलिसांचे बळी
तर शहरातील अनेक पोलिस ठाणी ही देखील अनधिकृत असल्याचे पुढे आले. वर्षभरापूर्वी आमदार नितेश राणेंनी त्याची पोल खोल केली होती. त्यांनी मुंबईतील ९४ पैकी ७२ पोलिस ठाणी ही अनधिकृत असून या स्टेशन्सकडे स्वत:च्या नावे वीज, पाणी, टेलिफोन्सचे कनेक्शन नसल्याचा दावा केला होता. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पोलिस उघड्यावर काम करू शकतात. मात्र पावसाळ्यात अनेकदा पोलिसांचे हाल होतात. त्यामुळे चौक्यांचे महत्व एसी बसून बोलणाऱ्यांपेक्षा उघड्या रस्त्यावर, नागरिकांची सेवा करणाऱ्या पोलिसाच माहित, २००४ पासून पोलिसांचा हा प्रश्न प्रलंबित असून ठाकरे सरकारच्या काळात तो मार्गी लागणार की पुढील वर्ष तसाच प्रलंबित राहणार हे पाहण औत्सुक्याचे राहणार आहे.